हॉर्न न वाजवण्याचे चालकांना आवाहन ; विद्यापीठ चौकात विद्यार्थ्यांकडून जागृती

Appeal to the drivers of no horn Awakening from students in University Chowk
Appeal to the drivers of no horn Awakening from students in University Chowk

पुणे (औंध) : वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाने होणारे ध्वनीप्रदूषण व दुष्परिणाम रोखण्यासाठी व नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने आज 'नो हॅार्न डे' साजरा करण्यात आला. पुणे परिवहन विभाग, पुणे शहर वाहतूक पोलिस व लोकमान्य मल्टीपर्पज को.आॅपरेटीव्ह सोसायटी लिमिटेडच्या वतीने आयोजित 'नो हॅार्न डे' ला विद्यापीठ चौकात चांगला प्रतिसाद मिळाला.

मॅाडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने सिग्नलजवळ थांबून हॉर्न न वाजवता वाहन चालवण्याचे व ध्वनीप्रदूषण टाळण्याचे आवाहन वाहनचालकांना केले. यावेळी आम्ही 'हॅार्न वाजवणार नाही. ध्वनी प्रदूषण टाळणार' अशा घोषणा देत व 'नो हॅार्न टुडे' अशा घोषणांचे फलक हातात घेऊन जनजागृती केली. यावेळी चतुःश्रृंगी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रकाश मासाळकर, उपनिरीक्षक संगम परगेवार, मॅाडर्न महाविद्यालाच्या प्राध्यापिका मंजूषा कुलकर्णी,हवालदार संजय आढागळे,भीमराव टुले,राम मोळके,,अंबादास साठे,पोलीस शिपाई सचिन क्षिरसागर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पाषाण,बाणेर रस्ता,औंध यामार्गे शहरात येणा-या व बाहेर जाणा-या वाहन चालकांना हॅार्न न वाजवण्याबद्दल आवाहन केले. तसेच आवश्यक असेल तेथेच हॅार्नचा वापर करावा याची जाणिव करुन दिली. ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला यांचा अचानक हॅार्न वाजल्याने होणारा गोंधळ व अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता कुठेही हॅार्नचा वापर करु नये, याचेही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मॅाडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात हॅार्नच्या ध्वनीप्रदूषणाच्या दुष्परिणामावर आधारित पथनाट्याचे सादरीकरणही केले.

रस्ता ओलांडताना किंवा चालताना ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी अचानक आलेल्या हॉर्नच्या आवाजाने बिचकतात व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यांना रस्ता ओलांडताना कुठलाही आवाज न करता सहकार्य केले जावे. तसेच हॉर्नच्या आवाजाने रुग्णांनाही त्रास होतो, याची दक्षता वाहनचालकांनी घेणे गरजेचे आहे. यासाठी आजचा दिवस महत्वाचा असून नागरिकांनी याचे पालन केले तर ध्वनी प्रदूषण टळू शकेल.

- प्रकाश मासाळकर, पोलिस निरीक्षक,चतुःश्रृंगी वाहतूक विभाग.

नागरिकांनी स्वयंस्फुर्तीनेच हॉर्न वाजवणे टाळायला हवे. कारण गरज नसताना वाजवल्या जाणाऱ्या कर्णकर्कश आवाजाने आजूबाजुच्या नागरिकांना त्रास तर होतोच यातून काहींना आजार पण जडू शकतात. मी आजपासून कधीच हॉर्न न वाजवण्याची शपथ घेतो व इतरांनाही यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करील.वाहतूक विभागाचा हा उपक्रम स्तुत्य असून नागरिकांनी यास प्रतिसाद देऊन रोज त्याची अंमलबजावणी करावी.

- मयूर पवार, वाहनचालक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com