वादळाशी झुंजलेल्या तान्हुल्याची सुरू आहे जीवनमरणाची लढाई 

hand
hand
Updated on

चास (पुणे) : खेड तालुक्यातील  मिरजेवाडी येथील आदिवासी ठाकर समाजातील चंद्रकांत गावडे यांचा बुधवारी झालेल्या चक्रिवादळाने संसार तर उद्धवस्त झालाच, पण या वादळात त्यांचा तीन महिन्यांचा आयुष नावाचा मुलगा उडून शेजारच्या घरावर जाऊन पडला. फक्त दैव बलवत्तर म्हणून तो या संकटात वाचला आहे. पण, त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्याच्यावर पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, हातावर पोट असणाऱ्या गावडे कुटुंबियांना रुग्णालयाचा खर्च हाताबाहेर आहे. त्यांना आपल्या कोवळ्या जिवावर उपचार करण्यासाठी मदतीचे हात पाहिजे.   

निसर्ग चक्रीवादळाने मोठा हाहाकार माजवला. अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले, तर कोणाची घरे कोसळली. अन्नधान्य भिजून नुकसान झाले, फळझाडे भुईसपाट झाली. खेड तालुक्यातही या वादळाने मोठे नुकसान केले. तालुक्यात तीन जणांचा बळी या वादळात गेला.

तसेच, तालुक्यातील मिरजेवाडी येथील आदिवासी ठाकर समाजातील चंद्रकांत गावडे यांचा संपूर्ण संसार उद्धवस्त केला. घरावरचे छप्परच उडून गेले. मात्र, त्यावेळी त्यांनी घराच्या पत्र्याच्या पाईपला आपल्या तीन महिन्यांच्या तान्हुल्यासाठी बांधलेला झोपाळाही पत्र्यासोबत उडाला. त्यावेळी झोपाळ्यात खेळणारा दोन महिन्यांचा चिमुकला उडून शेजारच्या घरावर जाऊन पडला. 

केवळ नशिब बलवत्तर म्हणून एवढ्या मोठ्या अपघातात आयुष वाचला. मात्र, त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे त्याला उपचारासाठी पिंपरी येथील डी. वाय. पाटील रूग्णालयात दाखल केले आहे. मात्र, हातावर पोट व त्यात संसार उद्धवस्त झालेला चंद्रकांत गावडे यांना आपल्या पोटच्या पोरासाठी रूग्णालयाचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न पडला आहे.

आयुष याच्या उपचारासाठी होत असलेला खर्च चंद्रकांत गावडे यांच्या हाताबाहेरचा आहे. सरकारकडूनही कोणताही मदतीचा हात त्याच्यापर्यंत अद्याप पोचलेला नाही. या कोवळ्या जिवावर उपचार करावे, यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन मिरजेवाडीचे सरपंच बाळासाहेब बुटे यांनी केले आहे.

आयुष याच्या उपचारासाठी मदत करण्याकरिता त्याचे वडिल चंद्रकांत सुखदेव गावडे यांच्या पुढील बॅंक खात्यावर रक्कम जमा करता येईल... 
खातेदाराचे नाव - चंद्रकांत सुखदेव गावडे
बॅंकेचे नाव- बॅंक आॅफ महाराष्ट्र
शाखा- चासकमान, ता. खेड, जि. पुणे
खाते क्रमांक- 60208839704
MICR code - 410014007
IFSC code - MAHB0000793  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com