आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी असा करा अर्ज 

मीनाक्षी गुरव
Wednesday, 3 March 2021

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर पाल्याला प्रवेश मिळावा, म्हणून ऑनलाइन अर्ज करायचा आहे का! अर्ज कसा भरायचा कळत नाहीये!, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये!! अहो, मग आता ‘टेन्शन’ सोडा.

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर पाल्याला प्रवेश मिळावा, म्हणून ऑनलाइन अर्ज करायचा आहे का! अर्ज कसा भरायचा कळत नाहीये!, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये!! अहो, मग आता ‘टेन्शन’ सोडा. शालेय शिक्षण विभागाने या अंतर्गत अर्ज भरणाऱ्या पालकांसाठी ‘मार्गदर्शक पुस्तिका’ जाहीर केली आहे. याद्वारे आता तुम्ही अवघ्या काही मिनिटांत अर्ज भरू शकणार आहात. या प्रवेशातंर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी (ता.३) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे. राज्यातील नऊ हजार ४३१ शाळांमधील ९६ हजार ५९७ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशासाठी ३ ते २१ मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. तसेच प्रवेशासाठी पालकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा भरा ऑनलाइन अर्ज 
१. अर्ज भरण्यासाठी ‘https://rte25admission.maharashtra.gov.in’ आणि ‘https://student.maharashtra.gov.in’ या संकेतस्थळावर क्लिक करा.
 २. संकेतस्थळ ओपन झाल्यावर ‘आरटीई २५ टक्के’ पोर्टलवर जा. 
३. ‘ऑनलाइन ॲप्लिकेशन’वर क्लिक करा. 
४. ‘न्यू रजिस्ट्रेशन’वर क्लिक करावे. 
५. विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, जिल्हा, मोबाईल नंबर ई-मेल आयडी अचूक भरावा. 
६. त्यानंतर ‘रजिस्टर’वर क्लिक करावे. 
७. ऑनलाइन अर्जात नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर युजर आयडी आणि पासवर्ड येईल. 
८. युजर आयडी आणि पासवर्डद्वारे आणि कॅपचा कोड टाकून लाॅगिन करावे. 
९. त्यानंतर येणाऱ्या ‘स्क्रिन’च्या आधारे नवीन पासवर्ड तयार करता येईल. 
१०. पुन्हा नवीन पासवर्डने लॉगिन करावे आणि त्यानंतर येणाऱ्या सविस्तर अर्ज भरावा.

जेईई मेन्स दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात

जिल्हानिहाय आरटीई २५ टक्के राखीव जागा असणाऱ्या शाळा आणि उपलब्ध जागा : 
पुणे : ९८५ : १४,७४१ 
नगर : ४०२ : ३,०१३ 
औरंगाबाद : ६०३ : ३,६२५ 
नागपूर : ६८० : ५,७२९ 
ठाणे : ६७७ : १२,०७४ 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आणखी एक खटला दाखल; ५ मार्चच्या निकालाकडे लक्ष

‘गुगल मॅप’द्वारे घराचा अचूक पत्ता हवा 
‘प्रवेशादरम्यान अर्ज भरताना पालकांनी ‘गुगल मॅप’च्या साहाय्याने घराचा पत्ता  अचूक द्यावा. पडताळणीदरम्यान पत्ता चुकीचा आढळल्यास पाल्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो, हे लक्षात घ्यावे. त्याशिवाय पालकांना अर्ज भरण्यासाठी जिल्हानिहाय मदत केंद्र उपलब्ध करून दिल आहेत. त्याची सविस्तर यादी संबंधित संकेतस्थळावर आहे. त्याद्वारे पालकांना अर्ज भरता येईल. प्रवेश अर्ज भरण्यासाठी कोणी पैसे घेत असेल, प्रवेश देऊ म्हणून आमिष दाखवीत असेल, तर पालकांनी त्याला बळी पडून नये.’’ 
- दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण विभाग

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apply for admission in 25 Percent RTE seats