esakal | पुढील महिन्यात सैन्यदल भरती
sakal

बोलून बातमी शोधा

Army Recruitment

पुढील महिन्यात सैन्यदल भरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती - येत्या ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात सैन्यदलात भरती (Army Recruitment) सुरु होणार असून आठवी, दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवारांना यात सहभागी होता येणार आहे. पुणे आर्मी रिक्रुटींग कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रीया सुरु झाली आहे. (Army Recruitment in Next Month)

नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांपुरतीच भरती प्रक्रीया मर्यादित असेल. ७ ते २३ सप्टेंबर या दरम्यान नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ही भरती प्रक्रीया होणार आहे. ९ ते २२ ऑगस्ट दरम्यान या साठीचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे आहे. २४ ऑगस्टनंतर ॲडमिट कार्ड मिळणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर जनरल ड्यूटी, ट्रेड्समॅन या पदांसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवारांना ट्रेड्समॅन मधील मेस कीपर, हाऊस कीपर यासारख्या पदांकरिता, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर टेक्निकल, सोल्जर नर्सिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करता येईल.

हेही वाचा: देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प औरंगाबादमध्ये

शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून लेखी परीक्षा घेतली जाईल. शेवटी मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे अ‍ॅडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे, डोमिसाईल प्रमाणपत्र, जात व धर्म प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र आदि कागदपत्र असणे आवश्यक आहे.

पुणे आर्मी रिक्रुटींग कार्यालयांतर्गत होणाऱ्या आर्मी भरतीमध्ये पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याचा समावेश केला आहे. या भरतीतील पात्रता, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, बोनस गुण व इतर बाराकावे जाणून घेतल्यास यामध्ये मुलांना सहज भरती होता येईल.

- उमेश रूपनवर, सह्याद्री करिअर ॲकॅडमी, बारामती.

loading image