तडीपार असतानाही वाढदिवस साजरा करण्यासाठी आला अन्...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

मनोज उर्फ डिंगरा फुलचंद ढकोलिया (वय 35, रा. रमाबाई आंबेडकरनगर, रावेत) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. शनिवारी (ता.1) फेब्रुवारीला ढकोलिया याचा वाढदिवस होता. त्यासाठी किवळे येथील मुकाई चौकातील एका हॉटेलमध्ये तो येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ताब्यात घेतले.

पिंपरी : तडीपार असतानाही वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. ही कारवाई किवळे येथील मुकाई चौकात करण्यात आली. 

पुण्यातील 'या' 7 तालुक्यात अजुनही मुलगी 'नकोशी'च

मनोज उर्फ डिंगरा फुलचंद ढकोलिया (वय 35, रा. रमाबाई आंबेडकरनगर, रावेत) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. शनिवारी (ता.1) फेब्रुवारीला ढकोलिया याचा वाढदिवस होता. त्यासाठी किवळे येथील मुकाई चौकातील एका हॉटेलमध्ये तो येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ताब्यात घेतले. ढकोलिया याला 18 नोव्हेंबर 2019 ला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीही तो देहूरोड येथे आल्याने युनिट पाचच्या पथकाने त्याला अटक करून देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता...

यासह डब्बू उर्फ हुसेन यासीन शेख (वय 31, रा. पारसी चाळ, देहूरोड) या तडीपार गुन्हेगारालाही गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्याला 9 डिसेंबर 2019 ला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही तो रविवारी (ता.2) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास देहूरोडमध्ये आला होता. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 

आणखी दोन संशयित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested Mahakali gang member In Pimpri