'ऑफलाइन'वरुन 'ऑनलाईन' आलेल्यांना आहे जगभर डिमांड!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

पुण्यातील केवळ काही अंशी एका परिसरापुरत्या मर्यादित असणाऱ्या अनुराधा आता केवळ पुणेच नव्हे, तर जगभरातील तब्बल आठ देशातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन अशा सर्व वयोगटातील कलेची आवड असणाऱ्यांना सर्जनशील कलेचे धडे देत आहेत.​

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घराबाहेर पडणं अशक्य झालयं; परिणामी हातातील कामही ठप्प झालयं का? मग जरा हे वाचा. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनुराधा यांच्याही उत्पन्नाचे साधन असणाऱ्या वर्ग आणि कार्यशाळेला कुलुप लागले. मात्र, मनात सातत्याने डोकाविणारी सकारात्मक सर्जनशीलता त्यांना स्वस्थ बसू देईना आणि मग काय टाळेबंद झालेल्या कार्यशाळेची कवाडे 'ऑनलाईन'च्या माध्यमातून खुली होऊन जगभर पोचली.

...म्हणून संभाजी ब्रिगेड उपराष्ट्रपतींना पाठविणार एक लाख पत्रं!​

जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेल्या अनुराधा डांगरे चित्र आणि हस्तकलेत पारंगत आहेत. एक कलाकार असण्याबरोबरच त्या व्यवसायाने शिक्षिका आहेत. भोसलेनगरमध्ये गेल्या काही वर्षांपासून त्या 'आर्ट वॉक - अ जर्नी टू क्रिएटिविटी'मार्फत वर्ग आणि कार्यशाळा घेत आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाला, परिणामी अनुराधा यांचेही वर्ग आणि कार्यशाळा घेणे बंद झाले. मात्र, अशा परिस्थितीतही खचून न जाता त्यांनी कलेची साधना अव्याहतपणे सुरुच ठेवली.

पुणेकरांनो, तुम्ही विद्यापीठ चौकमार्गे प्रवास करता? वाहतुकीतील नवा बदल जाणून घ्या!​

आपल्या मनातील नाविन्यापूर्ण संकल्पनांना त्या वाट करून देत होत्या. त्यासाठी कलेतून व्यक्त होत होत्या. अशातच एका कला साधकाच्या पालकांनी 'तुम्ही ऑनलाईन वर्ग, कार्यशाळा सुरू करा' असे अनुराधा यांना सूचविले. मुळात टेक्नोसॅवी नसलेल्या अनुराधा यांनी खुद्द त्या पालकांकडून ऑनलाईन मीटिंग कशी करायची, याचे धडे घेतले आणि ऑनलाईनवर कलेचे वर्ग आणि कार्यशाळा भरवायला सुरवात केली.

यापूर्वी पुण्यातील केवळ काही अंशी एका परिसरापुरत्या मर्यादित असणाऱ्या अनुराधा आता केवळ पुणेच नव्हे, तर जगभरातील तब्बल आठ देशातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन अशा सर्व वयोगटातील कलेची आवड असणाऱ्यांना सर्जनशील कलेचे धडे देत आहेत. लॉकडाऊनच्या काळात देशभरातील विविध शहरातील, तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई, कॅनडा, स्वित्झर्लंड येथील विद्यार्थ्यांना शिकवित आहेत.

दुकाने उघडण्यास पुणे महापालिकेची परवानगी पण...; वाचा काय आहेत बदल​

''कलेकडे केवळ कला म्हणून न पाहता, त्याकडे नाविन्यपूर्ण विचार देणारी कला म्हणून मी पाहते. तुम्ही सकारात्मक विचार केला, तर तुम्हाला त्यातून नकळत एक ऊर्जा मिळते. कोणतीही अडचण किंवा मोठे आव्हान आले, तरी या सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही त्यातून मार्ग काढता. किंबहुना तुम्हाला मार्ग सापडतोच, असा माझा विश्वास आहे. निसर्गाने माझ्यासाठी काहीतरी वेगळे ठरविले होते, याची जाणीव आता प्रकर्षाने होत आहे."
- अनुराधा डांगरे, कलाकार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Art teacher Anuradha Dangare shared her thoughts about online workshops