कशासाठी? पोटासाठी

सु. ल. खुटवड
Wednesday, 28 October 2020

थंडीतील व्यायाम शरीराला मानवणारा असतो. त्यामुळे हिवाळ्यात तळजाई टेकडीवर व्यायामाला सुरवात करायची, हा संकल्प गेली वीस वर्षे मी इमानेइतबारे सोडत आहे. यंदाही व्यायामाचे अनेक मुहूर्त पाहिले; पण सध्या पावसाळा सुरू आहे की हिवाळा हा संभ्रम पडल्याने दररोज नवीन मुहूर्त शोधू लागलो. खरं तर उधारी द्यायला आणि व्यायाम करायला ‘उद्याचाच मुहूर्त’ चांगला असतो, यात काय संशय नाही.

थंडीतील व्यायाम शरीराला मानवणारा असतो. त्यामुळे हिवाळ्यात तळजाई टेकडीवर व्यायामाला सुरवात करायची, हा संकल्प गेली वीस वर्षे मी इमानेइतबारे सोडत आहे. यंदाही व्यायामाचे अनेक मुहूर्त पाहिले; पण सध्या पावसाळा सुरू आहे की हिवाळा हा संभ्रम पडल्याने दररोज नवीन मुहूर्त शोधू लागलो. खरं तर उधारी द्यायला आणि व्यायाम करायला ‘उद्याचाच मुहूर्त’ चांगला असतो, यात काय संशय नाही. त्यातही ‘अहो, तब्येत किती झालीय तुमची. अगदी ढोल झालाय तुमचा’ या बायकोच्या वाक्‍याची दोन-तीन दिवस फोडणी बसल्याशिवाय व्यायाम करण्यासही ‘किक’ बसत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दररोज सकाळ- संध्याकाळ बायकोने आपल्यापुढे आलेल्या पोटाच्या तक्रारीचा ढोल वाजवल्यानंतर आपण उद्याचा मुहूर्त शोधतो. वाढत्या पोटाचा बायकोला का ‘पोटशुळ’ उठतो, हे समजत नाही. पोट असणे म्हणजे माणूस खात्या-पित्या घरचा आहे, हे सिद्ध होत नाही का? उलट पोट नसणारे व्यवस्थित खात-पित नाहीत, हा ‘पोटभेद’ ती का समजून घेत नाही? माझी ही सुदृढ प्रकृती पाहून अनेकांच्या विशेषतः बायकोच्या माहेरी पोटे का दुखतात? हे मला समजत नाही. त्यामुळे तिकडून टोमणे मारायला सुरुवात झाल्यानंतर बायकोचेही पित्त उसळते. शेवटी सुटलेले पोट कमी करण्यासाठी व्यायाम नाही केला, तर पोटाला खायला काही देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मिळाल्यानंतर तळजाई टेकडीवर धावावे लागते. अशावेळी ‘कशासाठी?

धनंजय मुंडेंसमवेत विसंवाद नाही : पंकजा मुंडे 

पोटासाठी’ ही ओळ आपोआपच ओठावर येते. तळजाईवर मी चालण्याचा व्यायाम करतो. त्या वेळी ‘चलते चलते यूं ही कोई मिल गया था’ हे गाणं आपोआप आठवत राहतं आणि माझी नजर सैरभैर होते. पण तीन-चार महिन्यांनंतरही काहीच ‘प्रगती’ होत नाही. त्यामुळे मी कंटाळून चालण्याचा व्यायाम सोडून देतो. धावण्याचा व्यायाम करतानाही ‘कितने भागोगे, क्‍या मिलेगा’ हे प्रसिद्ध वचन आठवते. मग हाही नाद सोडून द्यावा लागतो. मागे एकदा सायकलीसारखा व्यायाम नाही, हे बायकोने कुठेतरी वाचले आणि माझ्यासाठी तिने एक नवी कोरी सायकल घेतली.

पुणे महापालिकेतील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सुरेश जगतापांकडे

दुसऱ्या दिवशी साडेपाचलाच ती मला तळजाईवर पाठवू लागली. तिथे दोन तास सायकलवरून रपेट मारू लागलो. हा नित्यक्रम तीन महिने करूनही माझे वजन पावशेरही कमी झाले नाही, हे पाहून बायको काळजीत पडली. ती एकदा माझ्यामागोमाग आली. त्या वेळी माझा मित्र सायकल चालवत होता व मी त्याच्या मागे आरामात बसलो होतो, हे पाहून तिने कपाळावर हात मारला. ‘अहो, असा कुठे व्यायाम असतो का?’ असे म्हणून ती मला मारायला धावली. तिचा मार वाचविण्यासाठी मी जी धूम ठोकली, ती चार किलोमीटरवरील घर आल्यानंतरच थांबलो. तुम्हाला सांगतो, ‘गेल्या कित्येक वर्षांत असा धावण्याचा व्यायाम मी केला नव्हता.’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article SL Khutwad