आमुचे प्रवासपुराण

सु. ल. खुटवड
Monday, 30 November 2020

‘मागची बस रिकामीच आहे. त्यात या,’ असे सांगून चार कंडक्‍टरने आमचा पोपट केला. मात्र, कोणतीच बस रिकामी येत नव्हती. आता पुढच्या बसवेळी कंडक्‍टरवर अजिबात विश्‍वास ठेवायचा नाही, असा निर्धार आम्ही केला आणि ‘मागची बस रिकामीच आहे..’ असे म्हणणाऱ्या पाचव्या कंडक्‍टरला ‘अहो, ही बसपण रिकामीच आहे की’ असे म्हणत आम्ही आतमध्ये शिरलो.

‘मागची बस रिकामीच आहे. त्यात या,’ असे सांगून चार कंडक्‍टरने आमचा पोपट केला. मात्र, कोणतीच बस रिकामी येत नव्हती. आता पुढच्या बसवेळी कंडक्‍टरवर अजिबात विश्‍वास ठेवायचा नाही, असा निर्धार आम्ही केला आणि ‘मागची बस रिकामीच आहे..’ असे म्हणणाऱ्या पाचव्या कंडक्‍टरला ‘अहो, ही बसपण रिकामीच आहे की’ असे म्हणत आम्ही आतमध्ये शिरलो. ‘मागची बस रिकामी आहे’, हे कंडक्‍टरला कसे कळत असेल, हे कोडे आम्हाला अजून सुटले नाही. ‘सुटे पैसे आणि मास्क असेल तरच बसमध्ये या,’ हातातील चिमटा वाजवत कंडक्‍टरने घोषणा केली. प्रत्येक थांब्यावर कंडक्‍टरचा ‘मागच्या बसने या’ चा आग्रह चालूच होता. बसमध्ये ‘सुटे पैसे’ आणि ‘मास्कची’ उद्‌घोषणा होत होती. बसमध्ये नुकत्याच चढलेल्या दोघांनी मास्क घातला नसल्याचे पाहून ते चांगलेच खवळले. ‘‘मास्क घातला नाही, खाली उतरा,’’असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावर त्या दोघांनी गयावया केली. त्यावर कंडक्‍टरने पिशवीतील दोन मास्क काढून त्यांच्या हातात दिले. ‘प्रत्येकी पन्नास रुपये.’ त्या दोघांचाही नाइलाज झाला. त्यांनी पैसे देऊन, मास्क घेतले. पुढच्या दहा मिनिटांत अशाप्रकारे पंधरा मास्कची विक्री झाली होती. ‘हे बेकायदेशीर आहे. अडवणूक आहे’ असे आम्ही पुटपुटलो. ‘वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,’ असे आम्ही ठरवले. ‘प्रवाशांकडे मास्क नसेल तर आम्हाला दंड भरावा लागतो,’ आमच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून कंडक्‍टरने खुलासा केला.   

मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

तेवढ्यात एक तरुण मुलगा महिलांसाठीच्या राखीव जागेवर बसला असल्याचे त्यांना दिसले व एक मुलगी ‘त्याला तेथून ऊठ’ असे सांगूनही तो जुमानत नव्हता. ‘ओ हिरो, त्या मुलीला बसू दे तिथे,’ कंडक्‍टरने आवाज टाकला. ‘जमणार नाही. मी फेसबुकवर माधुरी या मुलीच्याच नावाने अकाउंट चालवतो. त्यामुळं मला येथे बसण्याचा अधिकार आहे,’ असा खुलासा त्याने केला. 
‘फेसबुकवर लोकांना नादी लाव. येथे माझ्या नादाला लागू नकोस. नाहीतर तुझा चांगला नाद पुरवीन,’ असा दम दिल्यावर तो मुलगा मुकाट्याने तेथून उठला.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी 

पुढे स्वारगेटवरील गर्दीत तीन महिला बसमध्ये आल्या पण एकीकडेही मास्क नव्हता. ‘मास्क असेल तरच या, नाहीतर उतरा,’ असे कंडक्‍टरने म्हटल्यावर त्या विनवणी करू लागल्या. मग कंडक्‍टरने तीन मास्क त्यांना विकत दिले. त्यानंतर त्या तिघीही शनिपाराच्या थांब्यावर उतरल्या. 

अप्पा बळवंत चौकातील थांब्यावर उतरण्यासाठी आम्ही पुढे आलो. मात्र, पाकीट मारल्याचे आमच्या लक्षात आले. चार हजार रुपये व दोन एटीएम कार्ड त्यात होती. मी कंडक्‍टरला तसे सांगितल्यावर त्यांनी कोणाला तरी फोन केला. ‘पाच मिनिटांपूर्वी तीन महिला शनिपारला उतरल्या असून, त्यांनी एकसारखे निळ्या रंगाचे मास्क घातले आहेत. त्या पाकिटमार असाव्यात. त्यांना पकडा, असे सांगितले व माझ्याकडे वळून म्हणाले, ‘तुम्ही ताबडतोब शनिपारच्या थांब्यावर जा. आम्ही पाचच मिनिटांतच तिथे पोचलो. त्या वेळी दोन पोलिसांनी तिघींना अडवले होते व माझे पाकीटही हस्तगत केले होते. हे दृश्‍य पाहून बसमध्ये मास्कविक्री करणाऱ्या कंडक्‍टरविषयी आमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. आता आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात ‘कंडक्‍टरची समयसूचकता’ यावर पत्र लिहण्याचे ठरवले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sl khutwad

Tags
टॉपिकस
Topic Tags: