सौर ऊर्जेचा वापर करणारी आर्वी ही जुन्नर तालुक्‍यातील दुसरी ग्रामपंचायत ठरली

Solar-Panel
Solar-Panel

पुणे - जुन्नर तालुक्‍यातील आर्वी ग्रामपंचायत कार्यालय विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. या ग्रामपंचायतीने विजेची गरज भागविण्यासाठी  पाच किलोवॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प आता कार्यान्वित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडीला आता या सौर प्रकल्पातून वीज पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे ही ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहे. सौर ऊर्जेचा वापर करणारी आर्वी ही जुन्नर तालुक्‍यातील दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधी टिकेकरवाडी ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेली आहे. सौर ऊर्जेचा वापर करणारी टिकेकरवाडी ही तालुक्‍यातीलच नव्हे तर, पुणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी तत्कालीन सरपंच सीमा डोंगरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला आहे. डोंगरे या ऑगस्ट अखेरपर्यंत गावच्या सरपंच होत्या. मात्र ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आणि कोरोनामुळे सार्वत्रिक निवडणुका लागल्याने, सध्या या ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. 

राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशामुळे मेडाने आर्वी ग्रामपंचायतींसाठी १०० टक्के अनुदानावर हा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर केला होता. ग्रामपंचायत इमारतीच्या टेरेसवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दरमहा विजेची ५००/६०० युनिटची बचत होणार आहे. 

पुण्यातील पर्ल एनर्जी सोल्यूशन या कंपनीने हा प्रकल्प कार्यान्वित करून दिला आहे. याआधीपासूनच गावात पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे दोन्ही पाणीपंप सौर ऊर्जेवर चालविण्यात येत आहेत. यामुळे पाणी पंपासाठीच्या विजेच्या देयकात मोठी बचत झाली असल्याचे तत्कालीन सरपंच सीमा डोंगरे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com