esakal | दुसऱ्या लाटेतील रुग्णांना ऑक्सिजनची गरज अधिक; आयसीएमआरचा अहवाल

बोलून बातमी शोधा

Oxygen

दुसऱ्या लाटेतील रुग्णांना ऑक्सिजनची गरज अधिक; आयसीएमआरचा अहवाल

sakal_logo
By
टीम इ सकाळ

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील रुग्णांना श्वसनासंबंधीचा त्रास अधिक जाणवत आहे. पर्यायाने दुसऱ्या लाटेतील रुग्णांना ऑक्सिजनची अधिक गरज भासत आहे, अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) एका अहवालातून पुढे आली.

आयसीएमआरने ऑक्टोबर-सप्टेंबर २०२० आणि आताचा मार्च-एप्रिल महिन्यातील रुग्णांच्या संख्येचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला, तेव्हा ही बाब स्पष्ट झाली. दुसऱ्या लाटेत रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे वय हे मागच्या लाटेच्या तुलनेत सरासरी ५०.४ वरून कमी होत ते ४८.९ वर आले आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी याला पुष्टी दिली आहे.

हेही वाचा: नागरिकांनो, गांभीर्य ओळखा ! वेळेतच खरेदी करा

ऑक्सिजनची देशातील मागणी आता सर्वोच्च पातळीवर आहे. तब्बल चार हजार ३०० मेट्रीक टन ऑक्सिजन दिवसाला सध्या लागतो. कोविडच्या आधी ही गरज फक्त ८५० मेट्रीक टन एवढी होती. ऑक्सिजनची देशातील वाढती गरज लक्षात घेता केंद्र सरकारने ५० हजार मेट्रीक टन ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रासह १२ राज्यांना सध्या ऑक्सिजनची गरज जास्त असून, तेथे १७ हजार मेट्रीक टनाचा अधिक पुरवठा करण्यात येणार आहे. व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

हेही वाचा: सिंहगड रस्त्यावर कचऱ्याला लागलेल्या आगीत तिघेजण होरपळले; घंटागाडीही जळून खाक

अहवालाचे निष्कर्ष

तपशील : पहिली लाट (टक्के) : दुसरी लाट (टक्के)

  • ऑक्सिजनची गरज असलेले रूग्ण : २७.८ : ५४.५

  • व्हेंटिलेटरची गरज असलेले रूग्ण : ३७.३ : २७.८

  • ४० वर्षावरील रूग्णालयात दाखल रूग्ण : ७२.२ : ६९.८

  • ० ते १९ वयोगटातील रूग्ण (एकूण रूग्णसंख्येपैकी) : ४.२ : ५.८

  • २० ते ४० वयोगटातील रूग्ण (एकूण रूग्णसंख्येपैकी) : २३.७ : २५.५

हेही वाचा: पुण्यातील तरुणाचा ‘अन्नपूर्णा’वर झेंडा