Pune News : नशिब बलवत्तर म्हणून वाचली मुले; आशुतोष थोरात

ट्रांसफार्मर रूम मध्ये गेलेल्या मुलांना काढले बाहेर
Ashutosh Thorat statement children survived transformer room pune kothrud
Ashutosh Thorat statement children survived transformer room pune kothrudsakal

कोथरूड : ट्रांसफार्मर रूम मधील उघडा असलेला फिडर पिलरला चुकून हात लागला असता तर त्या बालकांच्या जीवीताला फार मोठा धोका पोहचला असता. दिवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याने दाखवलेल्या जागरुकतेमुळे ही मुले सुखरूप बाहेर पडली. अशी माहिती सहाय्यक विद्युत अभियंता आशुतोष थोरात यांनी सांगितली.

थोरात म्हणाले की, एमआयटी महाविद्यालय रस्त्यावर मांडके अनुभव ही इमारत आहे. येथे विद्युत मंडळाच्या वतीने ट्रान्सफार्मर लावण्यात आलेला आहे. तेथे कडी लावलेली असते. काही छोटी मुले ही कडी उघडून ट्रान्सफार्मर रुम मध्ये शिरली. या रस्त्याने जाणा-या हर्षवर्धन मानकर यांना हे लक्षात येताच त्यांनी तातडीने आम्हाला कळवले.

रोहीदास जोरी, दिलीप कानडे व जनमित्र सागर जाधव यांनी तातडीने या मुलांना ट्रान्सफार्मर रुमच्या बाहेर काढले. चुकून जरी या मुलांचा हात फिडर पिलरला लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. आम्ही या रुमला नटबोल्ट लावून बंद केले आहे. चोरी वा उत्सुकतेपोटी काही जण अशा खोलीत जाण्याचा प्रयत्न करतात.

परंतु चुकून जर वीज वाहक उपकरणाला हात लागला तर जीवावर बेतू शकते. त्यामुळे नागरिकांनी अशी घटना दिसल्यास तातडीने वीज मंडळाशी संपर्क साधावा. दिलीप कानडे व रोहीदास जोरी म्हणाले की, देवाची कृपा की आम्हाला ही मुले आत गेल्याचे लक्षात आले. जाणते अजाणतेपणी दुर्घटना घडली असती. वीज मंडळाच्या कामगारांनी तातडीने धाव घेवून परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com