'कॅब' विरोधात पुण्यात आंदोलनाचा प्रयत्न; पोलिसांनी दडपले

टीम ई-सकाळ
रविवार, 15 डिसेंबर 2019

आसामी नागरिकांनी एकत्र येऊन रविवारी दुपारी चार वाजता फुर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर निदर्शने करण्यासाठी नागरिक एकत्र येणार होते. त्यासाठी डेक्‍कन पोलिस ठाण्यातून परवानगी घेतली होती.

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या नागरीकत्व सुधारणा कायदा (कॅब) संसदेत मंजूर घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात स्थायिक झालेल्या आसामी नागरीकांनी आयोजित केलेले आंदोलन पोलिसांनी दडपले. त्यांना दिलेली परवनागी नाकारून आंदोलन न करण्यासाठी बजावले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आसामी नागरिकांनी एकत्र येऊन रविवारी दुपारी चार वाजता फुर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर निदर्शने करण्यासाठी नागरिक एकत्र येणार होते. त्यासाठी डेक्‍कन पोलिस ठाण्यातून परवानगी घेतली होती. मात्र, परवानगी मिळताच अवघ्या काही काळात त्यांना परवानगी रद्द झाल्याचे सांगण्यात आले. निदर्शनाचे आयोजक बिद्युत सैकीया म्हणाले, "कॅब'च्या मंजुरीमुळे आसाममध्ये काय स्थिती आहे, तेथील लोकांची भावना काय आहे हे, पुण्यातील नागरिकांना समजून सांगणे महत्वाचे आहे. केंद्र सरकारने नागरिकांना विश्‍वासात न घेता हा कायदा केला आहे.

आणखी वाचा - एकेकाळी वजन होतं 120 किलो आज आहे आयर्नमॅन

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून लाखो घुसखोर आसाममध्ये आले आहेत. त्याचा दबाब येथील मुळ स्थानिक लोकांवर निर्माण झालेला आहे. असे असताना आता बाहेरच्यांना भारताचे नागरिकत्व दिले जात आहे. त्याचा दुर्गामी परिणाम तेथील स्थानिक आसामी लोकांवर होणार आहे. त्यामुळे यास विरोध करणे गरजेचे आहे. आज फुर्ग्युसन महाविद्यायाच्या गेटसमोर आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली होती. त्यांनी काही वेळाने परवानगी नाकारल्याचे पत्र आम्हाला दिले आहे. पोलिसांनी आमचा संविधानिक हक्क नाकारला आहे, असे सैकीया यांनी सांगितले.

आणखी वाचा - डेंगीपासून असा करा बचाव

डेक्‍कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड म्हणाले, 'आंदोलनासाठी परवानगी दिली होती. देशात सर्वत वातावरण गंभीर असल्याने पुण्यातही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assam people tried protest against cab act in pune police denied permission