esakal | ‘नॅक’कडून आकारण्यात येणारे मूल्यांकनाचे शुल्क झाले कमी
sakal

बोलून बातमी शोधा

NAAC

‘नॅक’कडून आकारण्यात येणारे मूल्यांकनाचे शुल्क झाले कमी

sakal_logo
By
- मीनाक्षी गुरव

पुणे - शैक्षणिक संस्था, वरिष्ठ महाविद्यालये, विद्यापीठे यांच्या मूल्यांकन प्रक्रियेसाठी ‘नॅक’कडून (NAAC) आकारण्यात येणारे शुल्क (Fee) तब्बल एक लाख रुपयांनी कमी (Less) करण्यात आले आहे. त्यामुळे जास्त शुल्क असल्याने आतापर्यंत या प्रक्रियेत सहभागी होऊ न शकलेल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील छोट्या महाविद्यालयांना, शैक्षणिक संस्थांना दिलासा मिळाला आहे. (Assessment Charges Levied by NAAC Reduced)

राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेची (नॅक) वरिष्ठ महाविद्यालयांसाठीचे मूल्यांकन शुल्क कमी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील पाठपुरावा केला आहे. देशातील वरिष्ठ महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांची शैक्षणिक, संशोधनात्मक, प्रशासकीय आणि संरचनात्मक गुणवत्ता ‘नॅक’मार्फत दर पाच वर्षांनी विविध निकषांच्या आधारे तपासली जाते. या तपासणीतून प्राप्त निष्कर्षांच्या आधारे महाविद्यालयांचे मानांकन ठरवले जाते. या मूल्यांकन प्रक्रियेसाठी नॅककडून महाविद्यालय व संस्थानिहाय वेगवेगळे शुल्क आकारले जाते. आतापर्यंत ‘नॅक’ मूल्याकंनाचे एकूण शुल्क हे सव्वा चार लाख रुपयांच्या आसपास होते. परंतु आता हे शुल्क एक लाख ३०० रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता वरिष्ठ महाविद्यालयांना एकूण तीन लाख २४ हजार ५०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी दिली.

हेही वाचा: आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट

राज्यातील १५ अकृषी विद्यापीठांपैकी १४ विद्यापीठांचे नॅक मानांकन झालेले आहे. उर्वरित गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ आता मूल्यांकनासाठी आता पात्र झाले आहे. दहा अकृषी विद्यापीठे नॅक पुनर्मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. ‘नॅक’तर्फे शुल्क कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी या मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. माने यांनी केले आहे.

राज्यात आतापर्यंत नॅक मानांकन झालेली महाविद्यालये :

- तपशील : एकूण महाविद्यालये : नॅक मानांकन प्राप्त महाविद्यालये : मानांकन प्राप्त महाविद्यालयांची टक्केवारी

- अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये : १, १७७ : १,०६९ : ९०.०५ टक्के

- विनाअनुदानित महाविद्यालये : २,०२६ : १९८ : ९.९० टक्के

- शासकीय महाविद्यालये : २८ : २३ : ८२.१४ टक्के

हेही वाचा: पीएमपीची निवडणूक हरली; पण सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची कुरघोडी

‘नॅक’ मूल्यांकनासाठी यापूर्वीचे आणि नवे शुल्क आकारणी :

शुल्काचा तपशील : २७ नोव्हेंबर २०१९ च्या परिपत्रकानुसार : १ एप्रिल २०२१ परिपत्रकानुसार

- वरिष्ठ अशासकीय अनुदानित महाविद्यालये, शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालये यांसाठी (नोंदणी शुल्क) : २५,००० रुपये : २५,००० रुपये

- नॅक प्रक्रिया शुल्क : १,८५,००० रुपये : १,००,००० रुपये

- पीर टिम भेट आणि इतर खर्च : १,५०,००० रुपये : १,५०,००० रुपये

- शुल्क : ३,६०,००० रुपये : २,७५,००० रुपये

- जीएसटी : १८ टक्के : १८ टक्के

- जीएसटीसह एकूण शुल्क : ४,२४,८०० रुपये : ३,२४,५०० रुपये

loading image