esakal | भांडणामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने वार

बोलून बातमी शोधा

crime
भांडणामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने वार
sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : भांडणामध्ये मध्यस्थी केल्याच्या कारणावरुन टोळक्‍याने तरुणावर तलवारीने वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास खडकमाळ आळी येथील मनपा कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुग्या उर्फ योगेश गाटे , सुशिल मिसाळ, करण उर्फ ठोब्या आगलावे, सनी शिंदे (सर्व रा.लोहीयानगर) यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध अशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहीत रागीर (वय 20, रा.घोरपडे पेठ) याने फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: सिंहगड रस्त्यावर कचऱ्याला लागलेल्या आगीत तिघेजण होरपळले; घंटागाडीही जळून खाक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहीतचा मित्र ऋतिक व आरोपींची काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. या भांडणांमध्ये मध्यस्थी करून रोहीतने ही भांडणे सोडविली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास रोहित व ऋतीक हे दोघेही मनपा कॉलनीतील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी रोहीतला शिवी देऊन आमच्या भांडणात का पडला ? असा जाब विचारला. त्यानंतर आरोपी फुग्याने आता 'तुझी विकेटच काढतो' म्हणत शर्टामध्ये लपविलेली तलवार बाहेर काढली. या तलवारीने रोहितवर वार केले, मात्र रोहितने वार चुकविल्याने तलवार त्याच्या अंगठ्याला लागल्याने तो जखमी झाला. दरम्यान, रोहितचा मित्र ऋतिकने त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यालाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

हेही वाचा: पालकांनो, लहान मुलांचे मानसिक आरोग्य जपताय ना?