Pune Crime News : उद्योजक नाना गायकवाडवर येरवडा जेलमध्ये हल्ला; पत्र्याने केले वार

बलात्कार, खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
Nana Gaikwad
Nana GaikwadSakal

पुणे, पिंपरी चिंचवडचे उद्योजक नाना गायकवाडवर कारागृहात हल्ला झाला आहे. गायकवाड सध्या येरवडा कारागृहात मोकाअंतर्गत शिक्षा भोगत आहे. सोलापूरमधल्या एका आरोपीने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.

नाना गायकवाड मोकामधील आरोपी आहे आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्यावर आज येरवडा कारागृहात एका कैद्याने पत्र्यासारख्या एका वस्तूने हल्ला केला. सोलापूरच्या गँगवार मधील देवा या नावाच्या आरोपीने नाना गायकवाड याच्यावर हा हल्ला केल्याचे समजत आहे.

नेमकं या दोघांमध्ये काय वाद झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गेल्या अनेक दिवसांपासून नाना गायकवाड येरवडा कारागृहात आहे. बलात्कार, खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्यावर मोका अंतर्गत देखील कारवाई केली आहे

पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे तसेच जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात त्याच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर बेनामी जमीन बळकवल्याचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्याकडे १०० कोटी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती सापडली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com