पुण्यात अतिक्रमण हटविणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांना धक्काबुक्की 

Attack on Pmc Employee and police for removing encroachment in pune
Attack on Pmc Employee and police for removing encroachment in pune
Updated on

पुणे : रस्त्यांवर अनधिकृतपणे थाटण्यात आलेल्या स्टॉलधारकांवर अतिक्रमण कारवाई करताना स्टॉलधारकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह महिला पोलिस कर्मचारी व अन्य पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. ही घटना रविवारी दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत हडपसर येथील मंत्री मार्केट परिसरात घडला. यापैकी हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 

रोहीत राजु जाधव (वय 22, रा. माळवाडी, हडपसर), गणेश अशोक अग्रवाल (वय 27), अनिल अशोक अग्रवाल (वय 23, , रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर), अमोल उमेश घोडके (वय 23, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, माळवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विलास अभंगे (वय 26) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पुणे: उधारी मागतोस का? तुझा धंदा बंद करेल...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी हे त्यांच्या पथकासह पोलिस बंदोबस्तामध्ये रविवारी दुपारी तीन वाजता हडपसर येथील मंत्री मार्केट परिसरामध्ये अतिक्रमण कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपींनी या कारवाईला विरोध केला. त्यावेळी महिला पोलिस कर्मचारी अश्‍विनी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांनी जप्त केलेल्या वस्तु आरोपींनी रस्त्यावर फेकून देत सरकारी कामामध्ये अडथळा आणला. याबरोबरच फिर्यादी यांनाही शिवीगाळ करुन त्यांना धक्काबुक्की केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com