esakal | 'दुपारी माझ्या घरी कोण शिरले' म्हणत एकावर कोयत्याने वार
sakal

बोलून बातमी शोधा

Attack by sharp Weapon in Bhosari

रविवारी (ता.1) रात्री पावणे दहाच्या सुमारास फिर्यादी हे गवळी माथा येथून पायी घरी जात होते. त्या वेळी ते मारुती मंदिराजवळ आले असता आरोपी दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. 'दुपारी माझ्या घरी कोण शिरले असे म्हणत आरोपी चौधरी याने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीवर वार केला.

'दुपारी माझ्या घरी कोण शिरले' म्हणत एकावर कोयत्याने वार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पादचारी तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीत घडली. शंकर चौधरी (वय 25), शुभम सुतार (वय 25, दोघेही रा. यशवंतनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रूपेश दिलीप बुजवडेकर (वय 19, रा. गवळी माथा, टेल्कोरोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

कृतिकाचे आई-वडील आता फोन उचलणार नाहीत, कारण...

रविवारी (ता.1) रात्री पावणे दहाच्या सुमारास फिर्यादी हे गवळी माथा येथून पायी घरी जात होते. त्या वेळी ते मारुती मंदिराजवळ आले असता आरोपी दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. ''दुपारी माझ्या घरी कोण शिरले असे म्हणत आरोपी चौधरी याने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीवर वार केला. सुतार याने मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

चिंचवडमध्ये गॅरेजला भीषण आग; मोठे नुकसान

loading image