esakal | बारामतीत अभाविपकडून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

baramati bjp

बारामतीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला. शहरातील पेन्सिल चौकात आज सकाळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. 

बारामतीत अभाविपकडून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क परत द्यावे, पुढील शैक्षणिक वर्षांच्या शैक्षणिक शुल्ताक 30 टक्के कपात करण्यात यावी, सरासरीच्या सूत्राने लावण्यात आलेल्या निकालांचे पुर्नमूल्यांकन करावे, या व इतर मागण्यांसाठी आज बारामतीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला. शहरातील पेन्सिल चौकात आज सकाळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. 

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा

सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गेल्या पाच महिन्याच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भातील महाराष्ट्र स्तरावर निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता कोरोनामुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांकडून या सत्राचे परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे. ही बाब अन्यायकारक असून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी केली गेली. 

बारामतीकरांसाठी मोठी बातमी, टोलबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्काच्या जास्तीत जास्त पंधरा टक्के शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे. स्वायत्त (खासगी) विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
दरम्यान, अब्दुल सत्तार यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या धुळे येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा या वेळी निषेध केला गेला. सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली गेली.  या वेळी अभाविपचे बारामती जिल्हा संयोजक समीर मारकड, अभाविप प्रदेश कार्यकारणी सदस्य वैभव सोलनकर, बाळासाहेब सोलनकर, किशोर आटोळे, स्वप्नील देवकाते,  प्रसाद भोसले, ओंकार जगताप, शुभंकर बाचल, अक्षय नाळे आदी उपस्थित होते.