Maratha Agitation : महिला कुस्तीगीरांच्या आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

केंद्र सरकारने महिला कुस्तीगिरांचे आंदोलन पोलिस बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न केला होता.
Gopal Tiwari
Gopal TiwariSakal

पुणे - केंद्र सरकारने महिला कुस्तीगिरांचे आंदोलन पोलिस बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचधर्तीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुकूमशाही पद्धतीने ‘मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्याचा’ प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.

तिवारी म्हणाले, शांततेने उपोषण सुरु असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला का केला ? याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. मराठा समाजाचे शांततेने व अहिंसेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येचे मोर्चे पाहिले आहेत. पण भाजपची सत्ता येताच आंदोलकांवर गुन्हे कसे दाखल होतात?, आरक्षण विरोधी मानसिकतेच्या प्रवृत्तींचे हे काय षडयंत्र आहे हे बाहेर आले पाहिजे.

सामाजिक न्याय तत्त्वावर राज्यांचा आरक्षणाचा अधिकार हिरावून केंद्राने १०२ वी घटना दुरुस्ती केली. मराठा व ओबीसी समाज आरक्षणासाठी ५० टक्क्यांवरील आरक्षण विधेयक आणण्याविषयी आणि इम्पिरिअल डेटा’ जाहीर करण्यासाठी भाजपप्रणित सरकार का उचलत नाही? यासंदर्भातील सत्य सर्वांच्या समोर येणे आवश्‍यक आहे, अशी मागणी तिवारी यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com