माळेगाव येथे शाळकरी मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न

कल्याण पाचांगणे, माळेगाव
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

माळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलाला पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून लोखंडी गजाच्या सहाय्याने पाच जणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रविवार (ता. ९) रोजी सायंकाळच्यावेळी वरील घटना गोविंदबाग नजिक नीरा-बारामती राज्यमार्गावर घडली.

त्या प्रकरणी जखमी वैभव उर्फ चिमू प्रभाकर माने (वय १७ वर्षे रा. खडकआळी, माळेगाव बुद्रूक) याने अक्षय वावरे, बाळू चव्हाण, पप्पू भोसले (सर्व रा. माळेगाव बुद्रूक) यांच्यासह इतर दोघांविरुद्ध फिर्याद दिली. ``मी व माझा मित्र अनिकेत राजू पिंगळे दुचाकीवरून मेसचे डबे देण्यासाठी शारदानगरकडे चाललो होतो. त्यावेळी अचानक आमच्या दुचाकीसमोर दोन दुचाकी येवून आडव्या थांबल्या.

PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

पप्पू भोसले, अक्षय वावरे, बाळू चव्हाण यांच्यासह दोघे तोंडाला रूमाल बांधलेले अनोळखी युवक मोटर साकयलवरून खाली उतरले. त्यापैकी अक्षय वावरे याने माझे अंगावर धावत येवून तु माझे विरूध्द पोलीस स्टेशनला तक्रार का दिली ? असे म्हणून माझा उजवा हात पिरगळला, तसेच पप्पू भोसले व बाळू चव्हाण आदींनी मारहाण केली, ``अशी तक्रार वैभव माने यांनी फिर्यादित नमूद केली. त्यानुसार पोलिसांनी संशयीत आरोपी पप्पू भोसले, अक्षय वावरे, बाळू चव्हाण यांच्यासह इतर दोघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रमोद पोरे करीत आहेत. 

PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to kill a school boy in Malegaon

टॅग्स
टॉपिकस