किरकोळ वादातुन तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

अपघाताच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला टोळक्‍याने कोयता व लाकडी दांडक्‍याने जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपी गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

पुणे : अपघाताच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला टोळक्‍याने कोयता व लाकडी दांडक्‍याने जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपी गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरेफ उर्फ आप्पा प्रकाश मुस्तारी (वय 24, रा.टिळेकरनगर, कोंढवा खुर्द), सुनील ऊर्फ राठ्या गोपाळ राठोड (वय 23, रा. एनडीए रस्ता, उत्तमनगर), प्रतिक उर्फ प्रद्या संजय नलावडे (वय 22, रा. येरवडा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. याप्रकरणी अमित रामदास निंबाळकर (वय 25, रा. गुजर निंबाळकरवाडी) यांनी फिर्याद दिली होती.

सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निंबाळकर व सागर माने हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोन महिन्यांपुर्वी त्यांच्यात धनकवडी येथे एका अपघातावरुन वाद झाले होते. त्या रागातुनच माने याने मुस्तारी, राठोड, नलावडे यांना निंबाळकर यास ठार मारण्यास सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी फिर्यादीला कात्रज येथील राजस चौकात गाठून त्याच्यावर लाकडी दांडका व कोयत्याने वार केले होते. त्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले होते.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

दरम्यान, या प्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत होते. संबंधीत गुन्ह्यातील आरोपी नवले पुलाजवळून खासगी ट्रॅव्हल्सने गोवा येथे पळून जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तिघांना अटक केली. राठोड याच्याविरुद्ध उत्तमनगर, वारजे माळवाडी व पौड येथे शस्त्र बाळगणे, मारहाणी व चोरीचे गुन्हे आहेत. नलावडे याच्याविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to kill a young man one arrested in Pune