esakal | चतुर्थी निमित्त महागणपतीला खरबूजांची आकर्षक आरास

बोलून बातमी शोधा

mahaganapati

चतुर्थी निमित्त महागणपतीला खरबूजांची आकर्षक आरास

sakal_logo
By
प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे शुक्रवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक महागणपतीला ३५१ खरबुजांची आकर्षक आरास करण्यात आली होती. चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सकाळी महागणपतीचा अभिषेक व पूजा करण्यात आली. तसेच दुपारी महापुजा व महानैवेद्य करण्यात आला.

हेही वाचा: पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत नऊ हजार जणांना ई-पास

वसंत देव यांच्या स्मरणार्थ ओंकार नितीन देव यांचेकडून चतुर्थीनिमित्त महागणपतीस ३५१ खरबूजांची आकर्षक आरास करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर नागरिकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद आहे. मंदिर बंद असले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांनी महागणपतीचे दर्शन घेतले. कोरोनाचे संकट लवकर दूर होण्यासाठी आज चतुर्थीनिमित्त महागणपतीला साकडे घालण्यात आले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त, पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: मंचर ग्रामपंचायत कोरोना नियंत्रण कक्षाचा रुग्णांना मानसिक आधार