घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणातील गुन्हेगार पॅरोलवर बाहेर आले होते. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्हे व सर्व कायदेशीर बाबी पडताळून या टोळीवर मोक्काची कारवाई केली जाईल. 

पुणे - औंधमधील शैलेश टॉवर सोसायटीत घरफोडी केल्यानंतर फरार होत असलेल्या चोरट्यांना पाहून पोलिस पळून गेल्या प्रकरणातील सराईत चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे तपास पथक व गुन्हेशाखा युनिट तीनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत टोळी जेरबंद केली. 

पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!​

बितूसिंग शामसिंग कल्याणी (वय 24, रा. हडपसर), रवीसिंग शामसिंग कल्याणी (वय 28), हुकूमसिंह रामसिंग कल्याणी (वय 37) व संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय 37) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बितूसिंग याच्यावर 58 गुन्हे दाखल आहेत. तर, रवीसिंगवर 49, हुकुमसिंग याच्यावर 26 आणि संगतसिंगवर 42 गुन्हे दाखल आहेत. चोरीची माहिती मिळाल्यानंतर चतुःश्रुगी पोलिस ठाण्याचे गस्तीवर असलेले पोलिस हवालदार प्रवीण गोरे व पोलिस नाईक अनिल अवघडे त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर शस्त्रधारी चोरटे पाहून पोलिस पळून गेले होते. दोन जानेवारी रोजी बिरजूसिंग व बिंतूसिंग रामटेकडी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून बिरजूसिंगला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने चाकूने वार केले. युनिट तीनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी इतर आरोपींचा शोध घेत होते. आरोपी शेवाळेवाडी परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक दत्ता काळे यांच्या पथकाने चौघांना अटक केली. 

IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणातील गुन्हेगार पॅरोलवर बाहेर आले होते. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्हे व सर्व कायदेशीर बाबी पडताळून या टोळीवर मोक्काची कारवाई केली जाईल. 
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aundh shailesh tower society theft