esakal | aundh : सुतारवाडीत रस्त्यावर पाणीच पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

औंध : सुतारवाडीत रस्त्यावर पाणीच पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंध : पाषाण परिसरातील सुतारवाडी स्मशानभूमीजवळ सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. काही वेळ पाऊस पडल्याने हि परिस्थिती उद्भवली असून रस्त्यावर

गुडघ्यापर्यंत पाणी वाहू लागल्याने दुचाकी बंद पडल्याचे प्रकारही घडले. या अशा परिस्थितीमुळे प्रत्येक वेळेस मोठा पाऊस झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ येते. वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.

हेही वाचा: लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी उपमुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण

मागच्या वर्षीसुध्दा याच ठिकाणी चेंबर फुटल्यामुळे हा रस्ता काही काळ वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. इथे असलेल्या उतारा बाबत त्याच वेळी प्रशासनाला माहिती देऊन

तातडीने यावर उपाययोजना करण्याची विनंती केली होती परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने थोड्या पावसातही रस्त्यावर पाणी साचल्याने नागरीकांचे हाल होतात असे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर उत्तरकर यांनी सांगितले.

loading image
go to top