Auto Expo 2024 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करा वाहन खरेदी; पुण्यात शनिवारपासून ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे आयोजन

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे दोन दिवसीय ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे. यामध्ये विविध कंपन्यांची अनेक वाहने असणार आहेत.
Auto Expo 2024
Auto Expo 2024sakal

पुणे - गुढीपाडव्याच्या मुर्हुतावर वाहनांची खरेदी करता यावी. तसेच वाहन खरेदीचा निर्णय घेताना अनेक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे दोन दिवसीय ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे. यामध्ये विविध कंपन्यांची अनेक वाहने असणार आहेत.

कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये शनिवारी (ता. १६) आणि रविवारी (ता. १७) एक्स्पो होणार आहे. वाहन खरेदी करण्याचे ठरल्यानंतर आपल्या बजेटनुसार विविध कंपन्यांची वाहने आपण तपासतो. त्यासाठी अनेक कंपन्यांच्या शोरूमला भेटी देऊन माहिती घेतो. नवीन गाडी घेताना करावी लागणारी धावपळ थांबविण्यासाठी ऑटो एक्स्पो भरविण्यात येत आहे.

यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलचेही अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे टेस्ट रार्इडचा आनंद घेत आपल्या स्वप्नातील वाहन बुक करण्याचा निर्णय घेणे सोपे होईल. एक्स्पोत २० हून अधिक ब्रँडचे ६०पेक्षा अधिक मॉडेल उपलब्ध असतील.

बजेटनुसार वाहनांचे पर्याय

पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक कार आणि दुचाकीचे अनेक पर्याय नागरिकांना एक्स्पोत उपलब्ध असणार आहेत. एकाच बजेटचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमकी कोणती गाडी घ्यायची? याचा निर्णय घेणे सोपे होणार आहे. या ठिकाणी विविध कंपन्यांच्या कार आणि दुचाकी, त्यांची वैशिष्ट्ये, किमती आदींची माहिती मिळणार आहे.

एक्स्पोविषयी...

  • कधी : १६ आणि १७ मार्च

  • कुठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर

  • केव्हा : सकाळी ११ ते रात्री आठ

  • स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : ९३२५१०६६२६

  • प्रवेश व पार्किंग मोफत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com