पुणे ग्रामीणमध्ये 130 लसीकरण केंद्र; जवळपास दीड लाख जणांना लस

more than 150000 Corona Vaccinated in Village Area in pune district
more than 150000 Corona Vaccinated in Village Area in pune district
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कामगार आणि सहव्याधीग्रस्त व ज्येष्ठ नागरिकांना मिळून आतापर्यंत १ लाख ३८ हजार ५३ जणांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. या लसीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये ४३ हजार ३७३ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन कामगारांना ही लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या लसीकरणासाठी सुरवातीला लसीकरण केंद्रांची संख्या कमी होती. पण आता ही संख्या १३० इतकी झाली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रसाद म्हणाले, ‘‘या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात औंध येथील जिल्हा रुग्णालय वगळता अन्य सर्व ठिकाणी सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस देण्यात येत होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्यात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या सोईसाठी खासगी रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.’’

बावीस हजार जणांचे दोन डोस पूर्ण
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २२ हजार ३५९ जणांनी कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. यामध्ये १४ हजार ९२६ आरोग्य अधिकारी व कर्मचारी, ७ हजार ४३३ फ्रंटलाइन वर्करचा समावेश आहे. याशिवाय ८ हजार ३७१ सहव्याधिग्रस्त आणि ४३ हजार ३७३ ज्येष्ठ नागरिकांनी ही लस घेतली आहे. सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांचा केवळ पहिलाच डोस पूर्ण झाला आहे. या दोन्ही प्रवर्गातील व्यक्तींचा दुसरा डोस अद्याप सुर झालेला नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com