रेडी रेकनरच्या दर वाढीचा प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

पुणे शहरातील रेडी रेकनरच्या (वार्षिक बाजारमूल्य दर) दरात सरासरी 5 टक्के वाढीचा प्रस्ताव तयार केला असल्याचे समजते. तर ग्रामीण भागात 2 टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

पुणे - विविध सवलती दिल्यानंतर राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षात (२०२१-२२) पुणे शहरातील रेडी रेकनरच्या (वार्षिक बाजारमूल्य दर) दरात सरासरी 5 टक्के वाढीचा प्रस्ताव तयार केला असल्याचे समजते. तर ग्रामीण भागात 2 टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासन त्यावर काय निर्णय घेणार, त्यावर ही वाढ लागू होणार की नाही, हे ठरणार आहे. 

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी एक एप्रिल रोजी रेडी रेकनरचे दर नव्याने लागू करण्यात येतात. त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षाच्या रेडी रेकनरचे नवे दर प्रस्तावित केले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली. ही सवलत येत्या 31 मार्चपर्यंतच आहे. दरम्यान मुद्रांक शुल्क विभागाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचे रेडी रेकनरचे दर तयार करण्याचे पूर्ण झाले आहे. यासाठी मागील वर्षभरात झालेल्या व्यवहारांच्या सरासरीवर नवे दर प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये शहरी भागात सरासरी 5 टक्के तर ग्रामीण भागात सरासरी 2 टक्के इतकी वाढ प्रस्तावित केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यामुळे दरवर्षी 1 एप्रिलपासून लागू होणारे रेडी रेकनरचे दर 2020 मध्ये लागू करण्यात आले नाहीत. वाढ करण्यास शासनाने स्थगिती दिल्यामुळे जुनेच दर कायम ठेवण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर 2020 पासून राज्य शासनाने रेडी रेकनरमध्ये वाढ दिल्याने नवे दर लागू करण्यात आले होते. 

धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या​

पुण्यातील रेडी रेकनरमधील वाढ 
वर्ष - रेडी रेकनरमधील वाढ 
2017-18 - 3.64 टक्के 
2018-19 - वाढ नाही 
2019-20 - वाढ नाही 
2020-21 - 1.25 टक्के 
2021-22 - 5 टक्के (प्रस्तावित) 

ग्रामीण भागातील वाढ 
वर्ष - रेडी रेकनरमधील वाढ 
2017-18- 15.30 टक्के 
2018-19 - वाढ नाही 
2019-20 - वाढ नाही 
2020-21 - 8.62 टक्के 
2021-22 - 2 टक्के (प्रस्तावित) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Average 5 percent growth proposal Pune ready reckoner rates