पुणे जिल्ह्यात दिवसाला आढळतात सरासरी ७९२ नवे कोरोना रुग्ण!

गजेंद्र बडे
Tuesday, 11 August 2020

सोमवारी दिवसभरात ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही रविवारी (ता.९) रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी (ता. १०) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता.११) दिवसभरात १ हजार ८०६ नवे कोरोना आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ९ हजार ३२६ आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या २ हजार ५०४ झाली आहे. यानुसार जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी ७९२ नवे कोरोंआ रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय प्रतिदिन सरासरी १८ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

पुणे शहरात आणि दिवसभरात ७६१, पिंपरी चिंचवडमध्ये ६७९, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २१७, नगरपालिका क्षेत्रात ७९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ७० नवे रुग्ण सापडले आहेत.

भाजप नेत्याच्या दबावाखाली 'त्या' ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट; अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशीची काँग्रेसची मागणी​

सोमवारी दिवसभरात ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही रविवारी (ता.९) रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी (ता. १०) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ११, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८ आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.आज  कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पिंपरीत रुग्णांची संख्या साडे नऊशेच्या घरात; मृतांची संख्याही घटली​

दरम्यान, सोमवारी दिवसभरात २ हजार ८३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ८२ हजार ४३२ झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ५० हजार ११३ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील २२ हजार ४०७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६ हजार ३२०, कॅंटोन्मेंट बोर्डातील १ हजार ८४२ आणि नगरपालिका क्षेत्रातील १ हजार ७५० कोरोनामुक्त झाले आहेत.

रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा अडीच हजार क्रॉस 

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा आकड्याने सोमवारी अडीच हजार क्रॉस झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ६७ रुग्ण आहेत. एकूण मृत्यूंपैकी पुणे शहरातील १ हजार ६०९ मृत्यू आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An average of 792 new corona patients are found daily in Pune district