पुणे : चौथीतील अवनिषने बनवले 'कोविड 19 लाईव्ह मॉनिटरिंग मॉडेल'; एकदा व्हिडिओ बघाच!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

- असा केला नऊ वर्षाच्या चिमुकल्याने लॉकडाऊनचा सदुपयोग 
- लॉकडाऊनच्या काळात टीव्ही, मोबाईल गेम्सवर वेळ वाया न घालवता नवनवीन 'गॅजेट्स' बनविण्याचे प्रयोग 

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात बच्चेकंपनी मात्र, घरात बसूनच कंटाळली. परंतु या काळात नऊ वर्षाच्या अवनिष बोरसेने मन रामविण्यासाठी नवनवीन उपकरणे बनविण्यास सुरुवात केली. तर नुकतेच त्याने एक 'कोविड 19 लाईव्ह मॉनिटरिंग मॉडेल' तयार केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या या मॉडेलबाबत अवनिष म्हणाला, "नवनवीन यंत्र तयार करायला आवडतं. लॉकडाऊनमध्ये खूप वेळ मिळाला आणि या वेळेत मी युट्युबवर असे यंत्र तयार करण्याचे व्हिडिओ पाहिले. तेव्हा मला 'आरडूइनो प्रोग्रामिंग'ची माहिती मिळाली आणि त्यातूनच मी अशे यंत्र घरात तयार केले आहे. यासाठी बाबांनी पण मला मदत केली. अशे गॅजेट्स तयार करताना त्यांचे वायर आणि 'चिप' हे बाबांच्या मदतीने जोडून घेतले. सध्या मी कोरोना रुग्णांच्या ऍक्टिव्ह केसेस काऊंट करणारे मॉड्युल तयार केले आहे. तर या आधी मी 'डिजिटल पासवर्ड डोअर लॉक', 'ऑटोमॅटिक कार पार्किंग सिस्टिम', 'रोबोटिक आर्म', 'डिजिटल कॅल्क्युलेटर' सारख्या वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या आहेत. मला गणिताची पण आवड आहे आणि मी अबॅकसचे क्लासेस पण करतोय. सध्या घरूनच शाळा सुरू असल्याने मी काही वेळ या गोष्टी बनविण्यासाठी देत आहे."

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

"अवनिषला अश्या गोष्टींची आवड असल्याने त्याला आम्ही लॉकडाऊनमध्ये मोबाईलवर गेम खेळण्या ऐवजी युट्युबवरून असे यंत्र बनविण्याचे व्हिडिओ बघण्यास सांगितले. त्याने कोणताही कंटाळा न करता 'आरडूइनो प्रोग्रामिंग'चे व्हिडिओ बघून या सर्व गोष्टी तयार करण्यास सुरुवात केली. सध्या मुलांना मोबाईलचाही चांगला वापर कळावा या हेतूने आम्ही हा प्रयोग केला. तसेच त्यानेही अगदी आवडीने हे काम केले आहे."
- मनोजकुमार बोरसे, अवनिषचे बाबा

इंदापूर कॉलेज झालं डिजिटल; विद्यापीठाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सगळ्यांत पहिला उपयोग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avinash borse form pune builds Covid 19 Live Monitoring Model