आॅनलाइन पोवाड्याच्या माध्यमातून स्त्री पराक्रमाचा अनोखा जागर

powada.jpg
powada.jpg
Updated on

सदाशिव पेठ (पुणे) : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कै.शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हिंगे यांचे सहकारी शाहीर नारायण सूर्यवंशी यांचा सन्मान व "नमन तूज शाहीरा स्त्री शक्तीचा जागर" अंतर्गत हिंगे लिखित स्त्री पराक्रमाचे पोवाडे हा कार्यक्रम आॅनलाइन पद्धतीने झाला. 

यावेळी समाजावरच्या व देशावरील संकटकाळात जेव्हा लोकांना ग्लानी आलेली होती, तेव्हा स्फूर्तीचा जागर मांडण्याचे काम शाहिरांनी केले. देशवासियांना कर्तव्याचे स्मरण देखील शाहिरींनी करुन केले.असे मत स्वरुपवर्धिनीचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश पुरंदरे यांनी व्यक्त केले. 

राजमाता जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, उमाबाई दाभाडे यांचे चरित्र पोवाडयातून सादर करण्यात आले. यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे, शाहिरा प्रा.संगीता मावळे, शाहीर महादेव जाधव, शाहीर होनराजराजे मावळे, तेजश्री येळापुरे, मुकुंद कोंडे, अनुजा जोशी, हर्ष येळापुरे, यांसह कलाकार सहभागी झाले होते. 

ज्ञानेश पुरंदरे म्हणाले, आपली घरे ही मंदिरे होण्याऐवजी थिएटर झालेली आहेत. सध्या दिवसरात्र माध्यमांतून आणि मोबाईलमधून ज्ञानवर्धनापेक्षा संस्कृतीचा लोप होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे घराघरात देशभक्तीचे संस्कार व्हायला हवे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे म्हणाले, महाराष्ट्र शाहिर परिषद ही संघटना हिंगे यांच्या 40 व्या वाढदिवसाला व शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनीची स्थापना त्यांच्या 61 व्या वाढदिवशी झाली. श्रेया लोणीकर, सुरेश तरलगट्टी, संदीप लचके यांनी आयोजनाकरीता सहकार्य केले. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com