वाहतूक पोलीसांकडून महामार्गावरील वाहनचालकांचे प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

महामार्गावर रस्त्याच्या कडेला रात्री वाहने उभी करू नयेत, जेणेकरून वेगात येणारे वाहन त्यास कंट्रोल न झाल्याने धडकून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये. सीट बेल्ट लावून वाहन चालवावे अशा प्रकारे वाहन चालविताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे याबाबत आळेफाटा महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरिक्षक संजय सुतनासे यांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांचे प्रबोधन केले.

सातगाव पठार - महामार्गावर रस्त्याच्या कडेला रात्री वाहने उभी करू नयेत, जेणेकरून वेगात येणारे वाहन त्यास कंट्रोल न झाल्याने धडकून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये. सीट बेल्ट लावून वाहन चालवावे अशा प्रकारे वाहन चालविताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे याबाबत आळेफाटा महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरिक्षक संजय सुतनासे यांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांचे प्रबोधन केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाहतुक महामार्गाचे मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालक भुषण कुमार उपाध्याय यांनी वाहतूक विभागाचा पदभार घेतल्यापासून अपघातास आळा बसावा यासाठी सर्व अधिकार्‍यांशी चर्चा करून उपक्रम हाती घेतला आहे. महामार्ग पोलिसांच्या वतीने रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेले आहेत. त्यानुसार पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले.

कचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन

पुणे-नाशिक महामार्गावर वाढलेले गवत महामार्ग पोलिसांच्या वतीने काढण्‍यात आले आहे. जेणेकरून दोन्ही बाजूचे रस्त्यावरील येणारे वाहन एकमेकांना दिसली पाहिजेत. वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत तसेच महामार्गावर वेगमर्यादेचे फलक लावून वेगावर मर्यादा ठेवूनच वाहन चालविने याबाबत पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी वाहनचालकांना मार्गदर्शन केले.

वाहत्या पाण्याला बांधणार कोण?

याप्रसंगी सहाय्यक पोलीस फौजदार दादासाहेब मोसे, ज्ञानेश्वर घनवट, लहु शिंगाडे, भिमा वायाळ, पोलीस हवालदार बाळासाहेब सुरकुले, माणिक मांडगे, सिताराम असवले, उत्तम वाजे, शंकर कोंढरे, पोलीस नाईक गणेश गवारी आदी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness of highway drivers by traffic police