Ayodhya Ram Mandir : बाणेर बालेवाडी येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

आयोध्या येथील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने संपूर्ण बाणेर बालेवाडी येथे उत्साही वातावरण पाहायला मिळाले. घरोघरी दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक सोसायट्यां मधून धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चौका चौकातून 'जय श्रीराम 'चे भगवे फडकवलेले पाहायला मिळाले .
banner
bannersakal

बालेवाडी ,ता २२. आयोध्या येथील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने संपूर्ण बाणेर बालेवाडी येथे उत्साही वातावरण पाहायला मिळाले. घरोघरी दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक सोसायट्यां मधून धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चौका चौकातून 'जय श्रीराम 'चे भगवे फडकवलेले पाहायला मिळाले .अनेक ठिकाणी संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी तसेच दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले

बाणेर बालेवाडी येथे ता.२२ जानेवारीच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने भगवे झेंडे हातात घेऊन नागरिकांनी उपस्थिती लावली .या वेळी ग्रामस्थांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून पुष्पवृष्टी केली. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये ही शोभायात्रा काढण्यात आली.' जय श्रीराम 'च्या जयघोषात संपूर्ण परिसरच दुमदुमून गेला .

banner
Ayodhya Ram Mandir : झेंडे, पताकांनी शहर झाले श्रीराममय...! धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे विविध स्‍तरांवर आयोजन

बालेवाडी येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठा हा सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांनी २४०० चौ. फूट आकाराची' जय श्रीराम 'या शब्दांचा वापर करून भव्य रांगोळी चे रेखाटन करून घेतले .हे रेखाटन श्रुती गणेश गावडे यांनी केले. या भव्य रांगोळीचे नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. असे सांगण्यात आले.

बालेवाडीतील अष्टविनायक मित्र मंडळ व माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडून श्रीराम यज्ञ व रामलीला प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले .या कार्यक्रमास उच्च तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते .तर बालेवाडी येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या कीर्तनाचे , तसेच रात्री दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले .याचे संयोजन भारतीय जनता पार्टी चिटणीस, पुणे शहर लहू बालवडकर यांनी केले.

बालेवाडी येथील सुप्रीम पाम सोसायटीमध्ये श्रीरामांची शोभायात्रा ,रामरक्षा पठण, हनुमान चालीसा ,श्रीराम आरती, दिपोत्सव साजरा करण्यात आला.सोसायटीतील मुलांकडून रामांच्या जीवना वर आधारित कथा तसेच नाटकांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. सोसायटीच्या आवारात फुलांची, संस्कार भारतीची रांगोळी रेखाटण्यात आली .बाणेर येथे सर्व मंदिरांची साफसफाई करून मंदिरांना विद्युतरोषणाई करण्यात आली. तर गणराज चौकातील श्री गणेश मंदिराजवळ विक्रम महाराज काळे यांचे कीर्तन ठेवण्यात आले.

त्याचबरोबर महाप्रसाद व महाआरती ही करण्यातआली. तर कै .बाबुराव सायर चौकामध्ये दिपोत्सव , आतषबाजीही करण्यात आली . या कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेविका ज्योती कळमकर व गणेश कळमकर यांच्याकडून करण्यात आले .तर बाणेर येथील विठोबा मुरकुटे उद्यानांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे व पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समिर चांदेरे यांच्याकडून आयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले .महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com