Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

Baba Adhav social activist : जाणून घ्या, बाबा आढाव यांनी एका मुलाखती बोलाताना राजकारणाबाबत सांगितलं होतंय़
Baba Adhav

Baba Adhav

esakal

Updated on

Why Baba Adhav Avoided Active Politics : अखंड समाजकार्यामुळे प्रचंड लोकप्रिय असूनही बाबा आढाव हे राजकारणा सारख्या क्षेत्रापासून दूरच राहिले. स्वत:चा सुरू असेलला वैद्यकीय व्यवसाय बंद करुन ते सातत्याने सामाजिक जीवनात मग्न होते. पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकपदाचा १९७१ साली दिलेला राजीनामा आणि  १९६७ ची खेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वगळता, बाबा कधीच राजकारणाच्या फंदात नंतर पडल्याचे दिसले नाहीत.

बाबा आढाव यांनी एका मुलाखती बोलाताना राजकारणाबाबत सांगितलं होतं की, ‘’१९६२ ते १९७० पर्यंत लौकिक अर्थाने मी राजकारणात सक्रीय होतो. परंतु समाजवादी पक्षाने आणीबाणीत पक्ष विसर्जित केला. ही एक ऐतिहासिक चूक समाजवादी मंडळीकडून झाली. अशाप्रकारची चूक डाव्यांनी केली नाही किंवा जनसंघाने देखील केली नव्हती.’’

तसेच, ‘’आमच्या राजकीय धुरिणांनी मला एकदा बजावले की, समाजकारणाचे जोडे दाराच्या बाहेर ठेवून पक्षीय राजकारणात या. द्विधा मनस्थितीत काम करण्यापेक्षा सामाजिक चळवळीत झोकून देण्याच मी निर्धार केला.’’ असं बाबा म्हणाले होते.

Baba Adhav
Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

बाबा आढाव हे पाच दशकांहुन अधिक काळ काम करणाऱ्या 'हमाल पंचायत' या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, आणिबाणी विरुद्ध लढा, मराठवाडा नामांतर लॉगमार्च, एक गाव एक पाणवठा, अण्णा हजारेंचे जनआंदोलन महागाई विरुद्ध मोर्च, अशा अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. या आंदोलनात त्यांना कित्येकदा तुरुंगातही जावे लागले होते. मात्र त्यांनी आपले कार्य कधीच थांबवले नाही.

Baba Adhav
Top ODI Indian Bowlers 2025 : वनडे सामन्यात 2025मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय बॉलर; हर्षित राणा टॉपवर!

याशिवाय, पुण्याच्या भवानी पेठेत स्थापन झालेली हमाल पंचायत संस्था, हमाल पंचायत शाळा, हमालासाठी घरे, हमाल पंचायत, कष्टाची भाकर, हमाल पतपेढी, हमाल मापाडी महामंड, महात्मा फुले समता प्रतिष्ठान व्याख्यानमाला, धरणग्रस्त परिषद, रिक्षा पंचायत, रिक्षा पतपेढी, टेम्पो पंचायत, कागद कचरा वेंचक पंचायत  अशा  अनेक संस्था त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने उभ्या केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com