पदवीधरमध्ये तिप्पटीने, तर शिक्षकांमध्ये दुप्पटीने मतदानाचा टक्का वाढला 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्या निर्माण झालेली चुरस आणि मतदार यादीतील घोळ असून देखील पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांत यंदा प्रथमच विक्रमी मतदान झाले. मंगळवार हा कामकाजाचा दिवस असून देखील मतदारांनी मतदानासाठी उत्साह दाखविल्याने ही टक्का वाढला.

पुणे - महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्या निर्माण झालेली चुरस आणि मतदार यादीतील घोळ असून देखील पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांत यंदा प्रथमच विक्रमी मतदान झाले. मंगळवार हा कामकाजाचा दिवस असून देखील मतदारांनी मतदानासाठी उत्साह दाखविल्याने ही टक्का वाढला. तर पुणे शहरात गेल्या वेळेपेक्षा यंदा पदवीधर मतदार संघात मतदानात तिप्पटीने तर शिक्षक मतदार संघात दुप्पटीने वाढ झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील यंदा निवडणूक ही अनेक अर्थाने वैशिष्टपूर्ण ठरली. नव्याने नोंदणी करण्यात आलेली मतदार यादी, यादीतील घोळ, केंद्रातील अंतर अशा एकीकडे त्रुटी तर दुसरीकडे उमेदवारांची भली मोठी संख्या त्यामुळे यंदा मतदान वाढणार की दरवेळेस प्रमाणे कमी होणार याबाबत उत्सुकता होती. परंतु राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान बाहेर काढण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि त्याहून अधिक मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे मतदानाच्या टक्केवारीने नवा विक्रम घडविला. गेल्या वेळेस पुणे शहरातील आठ मतदारसंघात मिळून सुमारे 14 टक्के मतदान झाले होते. यावेळेस सुमारे 42 टक्के मतदान झाले आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली. कामकाजाचा दिवस असल्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. शहरातील अनेक केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. घरापासून मतदान केंद्र लांब असून देखील अनेकांनी तेथे जाऊन मतदान केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले. तर यंदा प्रथमच या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रांच्या बाहेर बूथ लावण्यात आल्याचे दिसून आले. मतदारांना घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोय देखील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. तरुणाबरोबरच अनेक वयोवृद्ध पदवीधर मतदार बाहेर पडल्याचे चित्र अनेक केंद्रावर बघावयास मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रांवर सॅनिटायझर आणि थर्मल गनची सुविधा करण्यात आली होती. नियमांचे पालन करून मतदार मतदानाचा हक्क बजावत होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारीतील वाढ कायम राहिली.

पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी

टक्का आणखी वाढला असता 
एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर आल्याने त्याचा त्रास मतदारांना सोसावा लागला. एवढेच नव्हे, तर पुणे शहरातील काही मतदारांना मतदानासाठी पिंपरी-चिंचवड मधील केंद्र आले. खडकवाल्यातील मतदारांना धनकवडी अशा घोळाचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसला. मतदान करण्याची इच्छा असूनही लांबच्या अंतरावरील केंद्र आल्यामुळे अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यादी आणि मतदार केंद्र वाटपात हा घोळ झाला नसता, तर मतदानाचा टक्का आणखी वाढला असता, अशी कबुली अधिकाऱ्यांनी खासगीत दिली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: turnout tripled among graduates and doubled among teachers