esakal | बहिरवाडी गाव ठरले लसीकरण पुर्ण करणारे देशातील पहिले गाव
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : बहिरवाडी गाव ठरले लसीकरण पुर्ण करणारे देशातील पहिले गाव

पुणे : बहिरवाडी गाव ठरले लसीकरण पुर्ण करणारे देशातील पहिले गाव

sakal_logo
By
संतोष जंगम, श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

परिंचे : सहकार महर्षी चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय जगताप व राजवर्धीनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 'ग्रामीण' संस्थेच्या वतीने बहिरवाडी (ता. पुरंदर) येथील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले असून शंभर टक्के लसीकरण पुर्ण झालेले बहिरवाडी हे देशातील पहिले गाव ठरले आहे. ५४० लोकसंख्या असलेले बहिरवाडी गाव कोरोना मुक्त होते आता लसीकरण मुक्त झाले असल्याचे सरपंच दशरथ जानकर यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या प्रवास भत्त्यात वाढ

बहिरवाडी येथील संपूर्ण गाव फक्त पंचवीस लोकांचे लसीकरण झाले आहे.संपुर्ण गाव लसीकरणा पासून वंचित असल्याने ग्रामीण संस्थेच्या वतीने कोवीसील्ड लसीची खरेदी करून हा लसीकरण कार्यक्रम संपुर्ण गावासाठी राबविण्यात आला आहे. पहिल्या दिवशी १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण व दुसऱ्या दिवशी ६ महिने ते १८ वर्षांपर्यंत मुलांना इन्फ्लुएन्झा लसीकरण करण्यात आले असल्याचे ग्रामीण संस्थेचे संचालक डॉ.सुमीत काकडे यांनी सांगितले.गेल्या एक वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना रोगाने थैमान घातले असले तरी आज पर्यंत बहिरवाडी मध्ये एकही रुग्ण सापडला नसल्याचे सरपंच दशरथ जानकर यांनी सांगितले.

ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी (दि.१०) रोजी तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले होते.यावेळी सरनोबत यांनी ग्रामीण संस्थेच्या कामाचे कौतुक करून लसीकरण करण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची शासकीय नोंदणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: पिंपरी : पुरातन नाणे विकणाऱ्या नऊ जणांना अटक

गटविकास अधिकारी अमर माने म्हणाले, की बहिरवाडी गावात आजपर्यंत एकही रुग्ण सापडला नसल्याने 'कोरोना मुक्त गाव' योजनेसाठी या गावाची शिफारस करणार असल्याचे सांगितले.यावेळी काळदरी गावचे सरपंच गणेश जगताप, सुनीता कोलते, माऊली यादव, सागर मोकाशी, भारती गायकवाड, स्वाती होले, मुन्ना शिंदे, संदिप जगताप आदी ग्रामीण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.लसीकरण मोहीम यशस्वी राबवण्यासाठी डॉ. विनायक बांदेकर, डॉ.प्रतीभा बांदेकर, अनिल उरवने,डॉ दिपक मोरे, ग्रामसेवक काशीपती सुतार,आशा व अंगणवाडी सेविका अथक परिश्रम घेतले.

ग्रामीण संस्थेने आतापर्यंत काय काय केले?

*पुरंदर व हवेली तालुक्यात पहील्या लाॅकडाऊन काळात रोज 20 हजार लोकांना मोफत आनंदी थाळी दिली * 9 हजार कुटुंबांना किराणा दिला * रोज 5 हजार लिटर्स सर्वसमान्यांना दुध पुरविले * कोरोना योद्ध्यांना पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर वाटले * आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे पुरंदर व हवेली तालुक्यात घरटी वाटप केले * दुसऱया लाटेत खळदला 50 आॅक्सीजन बेडसह एकुण 150 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारले व आजही सुरु * 1200 हून अधिक रुग्ण सेंटरमधून घरी सुखरुप

हेही वाचा: SET अर्जासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मुदत वाढ