esakal | मनोज अडसुळचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
sakal

बोलून बातमी शोधा

bail before arrest of Manoj Adsul was rejected by the court

मनोज अडसुळचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : अॅट्रोसिटीचा गुन्हा लावण्याची भीती दाखवत डॉक्‍टरकडून 75 लाख रुपयांची खंडणी उकळलेल्या प्रकरणात मनोज अडसूळ याने केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला.

पती म्हणाला, मी तुला सांभाळणार नाही म्हणून पत्नीने घेतले स्वत:ला पेटवून

या प्रकरणात डॉ. दीपक प्रभाकर रासने (वय 69, रा. पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा डॉ. साहिल यांच्याविरुद्ध एका महिलेने ऑक्‍टोबर 2019 रोजी विनयभंगाची तक्रार विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणात अडसूळ याने ''तुमच्या मुलावर बलात्कार, अॅट्रॉसिटी'' असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी भीती फिर्यादी यांना दाखवली. त्या आधारे फिर्यादींकडून 75 लाख रुपये खंडणी घेतली. तर 55 लाखाची मागणी करीत होता, अशी फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार अडसूळ याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून, त्यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

पुणे : वारजेमध्ये एका रात्रीत चोरट्यांनी आठ दुकाने फोडली 

गुन्हा घडून अनेक महिन्यांचा कालावधी उलटला असून, फिर्यादी इतक्‍या दिवस का गप्प होते? अडसूळ आणि फिर्यादी यांच्यात व्यवहार झाला आहे. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देण्याची मागणी अॅड. ठोंबरे यांनी केली. यास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. अडसूळ याने पैशाच्या व्यवहाराची खोटी कारणे सांगितले. तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळावा, अशी मागणी फिर्यादी यांच्यावतीने अॅड. सचिन ठोंबरे यांनी केली केली होती. या निकाला विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे  अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.


व्यावसायिक चंदन शेवानी खून प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक