Yerwada Jail : बनावट कागदपत्र्यांच्या आधारे जामीन घेणाऱ्याची मुक्तता करू नये

जामिनासाठी बनावट व्यक्ती आणि खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात येऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
Yerwada Central Jail
Yerwada Central Jail sakal

पुणे - जामिनासाठी बनावट व्यक्ती आणि खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात येऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी हा आदेश दिला. याबाबत डेक्कन पोलिस स्टेशन ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य तो तपास करून आपले म्हणणे त्वरित सादर करण्याच्या सूचना देखील न्यायालयाने केल्या आहेत.

आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करून जामीन मिळवला असल्याचे एका मिळकतधारकाने वकिलामार्फत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची न्यायालयाने दखल घेत हा आदेश दिला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो म्हणून विक्रम रघुनाथ नलावडे (वय ४६ रा.औंध) यांच्याकडून दोन आरोपींनी एक कोटी २७ लाख ५० हजार रुपये घेतले.

मात्र आरोपींनी त्यांची फसवणूक केली. त्यामुळे नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धर्मेश प्रफुल्लचंद्र शहा (वय ५३) व आश्लेषा धर्मेश शहा (रा.गुजरात) यांच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात धर्मेश शहा याला पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये करण्यात आली होती. नुकताच त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

त्यासाठी आरोपीने न्यायालयामध्ये विजय विष्णू गोपाळे यांच्या मिळकतीचे सॉलवन्सी प्रमाणपत्र मावळ तहसीलदार यांच्याकडून तयार करून सादर केले होते. या सर्वांची माहिती गोपाळे यांना नव्हती. त्यामुळे त्यांनी ॲड. हेमंत झंजाड यांच्यामार्फत न्यायालयामध्ये हजर राहून अर्ज केली की, आरोपी शहाला मी ओळखत नाही. त्याला मी जामीनही राहिलो नाही. आरोपीने माझ्याच नावाचा बनावट व्यक्ती न्यायालयामध्ये जामिनासाठी उभा करून माझ्या मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करून जामीन मिळवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com