Balasaheb Thorat : भाजप असल्या संघटनेवर बंदी का घालत नाही?; थोरातांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat critisize bjp over pfi controversy pfi protest slogan video in pune

भाजप असल्या संघटनेवर बंदी का घालत नाही?; थोरातांचा सवाल

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यात पीएफआय संघटनेच्या आंदोलनावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यावर बोलताना कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रियी दिली असून अशा संघटनेवर बंदी घातली पाहिजे, भाजप का बंदी घालत नाही? भाजप त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे. आजपासून पुणे नवरात्रौ महोत्सव श्रीगणेश कला क्रिडा रंगमंच येथे सुरू झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, मंत्री म्हणजे जबाबदार व्यक्तिमत्त्व असतं, सगळे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी प्रयत्न करत होते त्या सर्वांचा सावंतांनी अपमान केला आहे, अशा शब्दात थोरातांनी सावंतांवर निशाणा साधला.

सर्व समाज राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होत आहेत, १९४२ ला जसे झाले तसे राहुल गांधी भारत जोडो काम करत आहेत. कोणी काही बोलाव हा त्याचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना खरोखरच महाविकास आघाडी यांनी वेदांता प्रकल्पासाठी प्रयत्न केले होते असे सांगून राज्यातील तरुणांचे रोजगार घालवले, गुजरात खुश करण्याच काम या सरकारने केलंय अशा शब्दात थोरात यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

हेही वाचा: संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन

दरम्यान आगामी महापालिकांच्या निवडणूकीत आघाडी म्हणून काम करू आणि त्या-त्या वेळी भूमिका ठरवू असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय झाला तर राज्यात राष्ट्रपती राज्यवट लागू शकते असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हेही वाचा: बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणारा चंपासिंह थापा देखील शिंदे गटात