संक्रांत जवळ येतेय; चायनीज-नायलॉनच्या मांजाविरुद्ध करा कारवाई!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

अतिशय धोकादायक असलेल्या मांजाने पक्षांचे तसेच अनेक नागरिक गंभीर जखमी केले आहे.

Makar Sankranti festival : सहकारनगर : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. संक्रांतीनिमित्त पतंग खरेदीसाठी लहान मुलांची लगबग सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पतंग विक्रीसाठी बाजारपेठा रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारच्या डीसाईनचे पतंग लावून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सजली आहे. मात्र पतंग उडविताना लागणारा दोरा हा कोणत्या प्रकारचा आहे. लहान मुले कोणता दोरा वापरतात याकडे मात्र कोणाचे लक्ष दिसत नाही.

- कोराई गडावर रात्री मुक्काम करणे विद्यार्थ्यांना पडले महागात; वाचा काय घडले?

दरवर्षीप्रमाणे यंदा ही बाजारपेठेत चायनीज नायलॉनचा मांजा मोठ्या प्रमाणात दुकानात विक्री केली जात असल्याचे चित्र शहरात आणि उपनगरात पाहायला मिळत आहे. मात्र पतंग उडवताना लागणारा मांजा हा सर्वत्र दुकानांमध्ये उपलब्ध झाला आहे, यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्‍न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

- एक्स्प्रेस हायवेवरच्या कोंडीला मिळणार फुलस्टॉप; 'या' ठिकाणी होतोय नवा बोगदा!

पन्नास रुपयाचा मांजा एखाद्या माणसाचं आयुष्य गमावू शकतो, हे आपण अनेक वेळा पाहिलेले आहे. तसेच आकाशात उडणारे पक्षीही मांजामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अतिशय धोकादायक असलेल्या मांजाने पक्षांचे तसेच दुचाकीवरून जाताना नागरिकांचे गळे कापले आहेत. तर अनेक नागरिक गंभीर जखमी केले आहे, असा चायनीज मांजा बाजारपेठ आणि दुकानात सर्वत्र उपलब्ध झाला आहे.

- CAA : 'नागरिकत्त्व'वरून यशवंत सिन्हा बरसले केंद्रावर; म्हणाले...

यावर खऱ्या अर्थाने कारवाई कोण करणार? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. मात्र, कर्तव्यदक्ष असणारे प्रशासन मात्र एकमेकांकडे बोट दाखवत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban on Chinese manja demanded by citizens of Pune