पीओपी मूर्तीवरील बंदी उठवावी; मूर्तिकार संघटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) पर्यावरणास हानिकारक असल्यामुळे पीओपीच्या गणेश मूर्त्या बनविण्यावर बंदी घातली.
POP Ganpati
POP GanpatiSakal

पुणे - ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) (POP) तुलनेत शाडू मातीच्या मुर्तीमुळे (Sculptures) पाण्याचे (Water) जास्त प्रदूषण (Pollution) होते. पीओपीच्या मूर्ती विसर्जन केल्यावर पाण्याच्या ‘पीएच’वर (हायड्रोजन आयॉन कॉन्सेन्ट्रेशन दर्शविणारे परिणाम) कोणताही परिणाम (Effect) होत नाही. पण शाडू मातीच्या मूर्तिमुळे पाण्यातील ‘पीएच’ कमी होऊन ते पाण्याला अम्लीय (ॲसिटिक) आणि गडूळ करते,’ असा दावा करीत मूर्तिकार संघटनेनी पीओपी मूर्तीवरील बंदी उठविण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) धाव घेतली आहे. (Ban POP sculptures should be lifted Sculptors Association runs NGT)

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) पर्यावरणास हानिकारक असल्यामुळे पीओपीच्या गणेश मूर्त्या बनविण्यावर बंदी घातली. सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पीओपीच्या मूर्त्यांमुळे पाण्यातील प्रदूषण वाढते. यासाठी नुकतेच श्रीगणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाकडून शाडू माती व पीओपीचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यानुसार शाळू मातीच्या मूर्त्यामुळे अधिक प्रदूषण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या चाचणीच्या आधारावर पीओपीवरील बंदी रद्द करण्यासाठी मूर्तिकार संघटनेच्यावतीने एनजीटीत दावा दाखल केल्याची माहिती मंडळाच्या हमरापूर विभागाचे कार्यकारी सल्लागार अजय वैशंपायन यांनी दिली.

POP Ganpati
पुणे : शहरात ७३ केंद्रांवर बुधवारी लसीकरण; ७,५०० डोस उपलब्ध

वैशंपायन म्हणाले, ‘पीओपीच्या मूर्तीमुळे पाण्यात प्रदूषण होत असल्याचा अद्याप शास्त्रीय पद्धतीने कोणताच अभ्यास सीपीसीबीने केलेला नाही. परंतु, तरी सुद्धा पीओपीच्या मूर्तीवर बंदी लावली आहे. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींचा पर्यावरणावर काय परिणाम होतो. हे समजण्यासाठी आम्ही पिरंगुट येथील पॉलीटेक प्रयोगशाळेत पीओपी आणि शाडूमातीची पावडर चाचणीसाठी पाठवली. चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठी असलेल्या राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या (एनएबीएल) वतीने या प्रयोगशाळेला मान्यता प्राप्त आहे.’

हे झाले चाचणीतून स्पष्ट

  • पीओपीच्या तुलनेत शाडू मातीमुळे पाण्याचे प्रदूषण जास्त

  • पीओपीमध्ये कॅल्शिअम व सल्फेट हे दोन प्रमुख घटक असून इतर घटक अल्पप्रमाणात

  • शाडू मातीच्या मूर्तिमुळे कॉपर, ॲल्युमिनिअम, आर्सेनिक, पारा (मर्क्युरी), शिसे, झिंक आदी घातक पदार्थ पाण्यात मिसळतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com