

कॅंपस
----------
केळी व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन
पंचनदी, जि. रत्नागिरी ः दापोली कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांच्या कृषी सखी गटाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत
वानोशी तर्फ पंचनदी येथील धातोंडी वाडीमध्ये केळी पीक व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते.
हे प्रात्यक्षिक अरुण उजाळ यांच्या शेतीवर घेण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केळी कोंबांची ओळख, अनावश्यक कोंब छाटणी, पुनर्लागवड आणि टिश्यू कल्चर जी-९, लाल वेलची, सफेद वेलची जाती तसेच केळी प्रक्रियेबाबत डॉ. महेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषी सखी गटातील शबरी चव्हाण, संजना जंगले, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम., मुस्कान कसोटीया, नित्या राज या कृषिकन्यांनी केले होते. या प्रात्यक्षिकाबद्दल सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ज्ञ डॉ. महेश एम. कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशीष शिगवण, आणि डॉ. प्रवीण झगडे यांनी मार्गदर्शन केले.
---------------------
W41537
पंचनदी, जि. रत्नागिरी ः केळी व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिकामध्ये सहभागी शेतकरी आणि कृषिकन्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.