बारामतीत 303 जणांच्या तपासणीत आढळले 55 जण पॉझिटीव्ह

In Baramati 303 people tested and 55 were positive
In Baramati 303 people tested and 55 were positive

बारामती : कोरोनारुग्णांची संख्या आज एकदम घटल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला. काल घेतलेल्या 303 नमुन्यांपैकी 55 जण पॉझिटीव्ह सापडले. यात 204 आरटीपीसीआर तपासण्यांमध्ये 21 जण तर 99 रॅपिड अँटीजेन तपासणीमध्ये 34 जण पॉझिटीव्ह सापडले. यामुळे बारामतीतील रुग्णसंख्या आता 2642 पर्यंत गेली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1391 पर्यंत गेली आहे. दरम्यान मृत्यूचा आकडाही वाढला असून शहर व तालुक्यात 63 जणांचा कोरोनाने अद्याप मृत्यू झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तपासण्यांच्या संख्येत रुग्णसंख्या घटल्याने आज प्रशासनास किंचित दिलासा मिळाला आहे. बारामतीत कोरोनाचा आकडा शून्यावर आणण्याचे उद्दीष्ठ निश्चित करुन बारामतीची वाटचाल सुरु झाली आहे. दुसरीकडे रुग्णालयातील जागा वाढविण्यासह व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावरही भर दिला जात आहे. 

दरम्यान सकाळने प्रसिध्द केलेल्या रेमीडेसेव्हर इंजेक्शनच्या तुटवड्याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने आजपासून सर्व दुकानदारांकडून आलेला स्टॉक व शिल्लक इंजेक्शनची संख्या यांचा तपशिल मागविण्यास प्रारंभ केला आहे. काल बारामतीत इंजेक्शन आल्यानंतर ती खरेदी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी उसळली होती. प्रत्येक रुग्णाला सहा इंजेक्शन्स द्यावी लागत असल्याने त्या प्रमाणात साठा उपलब्ध करुन देण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीनेही आजपासून या प्रक्रीयेवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.  

सव्वासात कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

 बारामती केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
बारामतीकरांना रेमीडेसेव्हर इंजेक्शन्स वेळेवर व सहजतेने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने बारामती केमिस्ट अँड ड्रगिस्ट या औषध दुकानदारांच्या संघटनेने कालपासून व्हॉटसअँपवर ग्रुप करुन त्या माध्यमातून इंजेक्शनची उपलब्धता किती आहे ही माहिती देण्याची सोय केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com