बारामती पुन्हा सहा जण कोरोनाग्रस्त; 22 रिपोर्ट येणे अद्याप बाकी

मिलिंद संगई
रविवार, 2 ऑगस्ट 2020

बारामतीत दिवसागणिक कोरोनारुग्णांचा आकडा वाढतच आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत 145 जण कोरोनाग्रस्त झालेले होते. या पैकी 14 जणांचा मृत्यू झाला असून 71 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून उर्वरित 60 जण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

बारामती  : शहरात आज पुन्हा सहा जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्याने पुन्हा एकदा बारामतीत कोरोनाचा फैलाव वेगाने होतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अजूनही 22 जणांचा अहवाल प्रतिक्षेत असल्याने यात आणखी काही रुग्ण पॉझिटीव्ह येतात का याची चिंता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामतीत दिवसागणिक कोरोनारुग्णांचा आकडा वाढतच आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत 145 जण कोरोनाग्रस्त झालेले होते. या पैकी 14 जणांचा मृत्यू झाला असून 71 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून उर्वरित 60 जण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 
 
आज सापडलेल्या रुग्णांमध्ये डोर्लेवाडी, बारामतीतील समर्थनगर, तांबेनगर, पाटस रोड, कचेरी रोड व वडगाव निंबाळकर येथील रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या वाढली की त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचीही संख्या वाढते, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. 

परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!​

बारामतीतील रुई, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय व बारामती हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सोय केली जात आहे. स्वताः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतील स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत. प्रत्येक रुग्णाला वेळेवर व योग्य उपचार मिळाला पाहिजे, याची काळजी यंत्रणेने घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, रक्षाबंधनासह आगामी सणांच्या काळात नागरिकांनी प्रवास करण्याचे टाळावे, एकमेकांच्या घरी बाहेरगावाहून येणे जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना कमालीचे जपले पाहिजे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. अनेकदा आपल्यामुळे अनेकांना कोरोनाची बाधा होऊ शकते याची जाणीव प्रत्येकानेच ठेवायला हवी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

"आजपासून बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्याने गर्दी आणखी वाढण्याची भीती आहे. दुकानदारांनीही व्यवसाय करताना स्वत:ची व आपल्या कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घ्यायला हवी, "अशी सूचना करण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati again found six corona positive