"संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे लवकरच बारामतीत भूमीपुजन"

राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमीपुजन लवकरच बारामतीत घेणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली
deputy cm ajit pawar pune
deputy cm ajit pawar pune sakal

बारामती : राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमीपुजन लवकरच बारामतीत घेणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. बारामतीतील एका कार्यक्रमात बोलतांना अजित पवार यांनी ही माहिती दिली. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्याचा मनोदय अजित पवार यांनी बोलून दाखविला.

deputy cm ajit pawar pune
ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे काम त्वरित सुरु करावे अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलून दाखविली होती. त्याच कार्यक्रमात अजित पवार यांच्याशीही त्यांची चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने आता नितीन गडकरी व शरद पवार यांच्या सोयीनुसार भूमीपुजनाचा कार्यक्रम बारामतीत घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

दरवर्षी वारीच्या निमित्ताने पायी पंढरपूरला जाणा-या वारक-यांना त्रास होऊ नये व वाहतूकही सुरळीत राहावी या उद्देशाने हा रस्ता उभारला जाणार आहे. पाटस पासून पुढे पंढरपूरपर्यंत हा रस्ता तयार केला जाणार असून भूसंपादनाचे काम सध्या वेगाने सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com