esakal | बारामती येथे शिवसेनेच्या 'या' नेत्याचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled

आंदोलनकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले.

बारामती येथे शिवसेनेच्या 'या' नेत्याचा निषेध

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे, बारामती

माळेगाव : बारामती शहरातील भिगवन चौक या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ आंदोलन केले.  

छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याचा पुरावा माजी खासदार छत्रपती उदयन महाराजांना मागण्याच्या निषेधार्थ वरील आंदोलन करण्यात आले.

भाजपचे ‘अब तक सत्तावन’

यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले.

आंदोलनकर्त्यांनमध्ये भाजपाचे कार्यकर्ते सुरेंद्र जेवरे, नितीन भामे, प्रशांत सातव, विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते आदींचा समावेश होता. दरम्यानच्या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान -बारामती या संघटनेनेही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे खासदार संजय राऊत यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

#SaturdayMotivation अन् तिने केले पुरूष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व...

आंदोलनावेळी ज्ञानेश्वर माने, संग्रामसिंह बाप्पू जाचक, रविंद्र भगत, भार्गव पाटसकर, स्वप्नील भैया मोरे, ओंकार रासने, आभिजित डफळे, पितांबर सुभेदार, महेश चांदगुडे आदी उपस्थि्त होते.