बारामतीमध्ये तोतयाचा पराक्रम; अजित पवारांचे नाव घेत दिली बांधकाम व्यावसायिकाला धमकी

मिलिंद संगई
Saturday, 17 October 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वापरुन मुंबईतील बांधकाम व्यावसायिकास धमकाविणा-यास शहर पोलिसांनी आज अटक केली. मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक अजय कामदार यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी तुषार तावरे (रा. तारांगण सोसायटी, बारामती) यास पोलिसांनी अटक केली.

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वापरुन मुंबईतील बांधकाम व्यावसायिकास धमकाविणा-यास शहर पोलिसांनी आज अटक केली. मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक अजय कामदार यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी तुषार तावरे (रा. तारांगण सोसायटी, बारामती) यास पोलिसांनी अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले की, अजय कामदार यांना तुषार तावरे याने फोन करुन मी उपमुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असून अजितदादा पवार यांच्याकडे आपल्याविरुध्द तक्रार आली आहे, ती तुम्हाला व्हॉटसअँपवर पाठवली आहे ती बघण्यास सांगितले. या तक्रारीवर तत्काळ कारवाई करावी असा शेरा मारुन पोलिस उपआयुक्त झोन 9 तसेच सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना रिमार्क मारुन त्या खाली उपमुख्यमंत्री यांची सही असल्याचे कामदार यांना दिसले. या नंतर कामदार यांनी घाबरुन तुषार तावरे याच्याशी संपर्क साधला असता तुमच्याविरुध्द दिलेला अर्ज मी कमीशनर यांच्याकडे पाठविला नसून माझ्याकडेच ठेवला आहे, तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत ते तीन दिवसात मिटवून घ्या, नाहीतर तुमच्या विरुध्द कारवाई होईल, असे तावरे याने धमकावले. 

चोरट्यांची 'छप्पर फाड के' चोरी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला

या नंतर कामदार यांनी थेट उपमुख्यमंत्री कार्यालयात फोन लावून याची चौकशी केल्यानंतर तुषार तावरे नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचे सांगितले. अजित पवार आज बारामतीत असून त्यांनाच हा प्रकार सांगा, असे सांगितले गेले. त्या नंतर कामदार यांनी बारामती गाठत पवार यांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांची भेट घेतली. त्या नंतर मुसळे यांनी कामदार यांना तातडीने पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्या नंतर कामदार यांनी शहर पोलिसात तुषार तावरे याच्या विरोधात फिर्याद दिली. 

मास्क न घातल्यामुळे कारवाई करणाऱ्या पोलिसाच्या पायावर पठ्ठ्यानं घातली दुचाकी

दरम्यान तुषार तावरे याने अन्य कोणाची उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाने फसवणूक केली असल्यास बारामती शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati builder threatened Ajit Pawar name of Ajit Pawar