Ajit Pawar : बारामतीच्या विकासकामात बांधकाम व्यावसायिकांचे योगदान हवे

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या पदग्रहण समारंभात अजित पवार बोलत होते.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on

बारामती - शहर व तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने सुरु असलेल्या विविध विकासकामांमध्ये बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांनीही योगदान द्यायला हवे, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar
Marathi News Update : शिंदेंच्या बंडाला वर्षपूर्ती ते मोदींचा अमेरिका दौरा, दिवसभरातील प्रत्येक अपडेट वाचा

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष सचिन देशमुख, उपाध्यक्ष सुनील मुंदडा, राज्यातील एकमेव महिलाध्यक्षा नीलीमा पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष उध्दव गावडे, मावळते अध्यक्ष विक्रांत तांबे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी नवनिर्वाचित कार्यकारिणी मधील अध्यक्ष उध्दव गावडे, उपाध्यक्ष साहिल खत्री, सचिव आदेश वडूजकर, खजिनदार चंद्रकांत शिंगाडे, सहसचिव नितिश शहा, सदस्य- किशोर मेहता, मनोज पोतेकर, आशपाक सय्यद, सुनील देशमुख, दत्तात्रय बोराडे, सुशील जाधव, राजेंद्र खराडे, अविनाश लगड, दीपक काटे, दीपक मलगुंडे, शामराव राऊत, अविनाश सूर्यवंशी, चेतन वाल्हेकर, सुधीर शिंदे, दत्तात्रय रणवरे, ओंकार देवळे, सुशील घाडगे, संजय संघवी व विक्रांत तांबे यांनी पदाची शपथ घेतली.

Ajit Pawar
Ajit Pawar : चाळीस आमदारांना खूष करायला वाट्टेल ते सुरु आहे

अजित पवार म्हणाले, सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आज बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाते, या क्षेत्राच्या माध्यमातून बारामतीत विविध विकासाच्या कामांना गती द्यायला हवी. बारामतीत नऊ एकर जागेवर प्रशस्त उद्यान विकसीत केले जाणार आहे, शहरातील सर्वांनीच विकासाच्या या कामात योगदान देण्याची गरज आहे. बिल्डर असोसिएशनने एखादा रस्ता ताब्यात घेऊन तेथील जबाबदारी स्विकारायला हवी. बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक प्रकल्प हातात घेतले असून येत्या काही दिवसात बारामती अधिकाधिक सुंदर होईल.

सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले. उध्दव गावडे यांनी स्वागत केले.

बारामतीकरांच्या सहकार्याची गरज...

मी पहाटे पाचला उठून कामाला सुरवात केली तरी जो पर्यंत बारामतीकर सहकार्य करत नाहीत तो वर विकासकामांना म्हणावे असे यश मिळत नाही. लोकसहभाग विकासकामात सर्वात महत्वाचा असतो.

- अजित पवार, विरोधी पक्षनेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Marathi News Esakal
www.esakal.com