esakal | बारामतीत डॉक्टरांची व्हेन सर्किट प्रणाली रुग्णांना ठरतेय वरदान

बोलून बातमी शोधा

Baramati doctors in circuit system is useful for corona patient
बारामतीत डॉक्टरांची व्हेन सर्किट प्रणाली रुग्णांना ठरतेय वरदान
sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : ''कोविडचा रुग्ण ऑक्सिजनवर असताना जर त्याला व्हेंटीलेटरची गरज भासली तर व्हेंटीलेटर मिळेपर्यंत त्याला स्थिर ठेवण्यासाठी एक अभिनव प्रणाली बारामतीतील काही डॉक्टरांनी वापरण्यास प्रारंभ केला आहे. ही प्रणाली नवीन नसली तरी याचा वापर फारसा होत नव्हता, मात्र ही प्रणाली रुग्णाला मदत करणारी ठरु शकते असा दावा बारामतीतील डॉक्टरांनी केला असून इतरही डॉक्टरांनी ही प्रणाली वापरावी'', असेही आवाहन करण्यात आले आहे.

बारामतीतील डॉ. राहुल जाधव, डॉ. सुजित अडसूळ, डॉ. सदानंद काळे यांच्या एकत्रित प्रयत्नानंतर ही प्रणाली उपयुक्त ठरते आहे, असे दिसून आले आहे. डॉ. राहुल जाधव यांनी त्यांच्या रुग्णालयात व्हेन सर्किट ही प्रणाली काही रुग्णांवर वापरली. त्या मुळे रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल लगेचच उंचावली व ती स्थिरही राहू लागली. अनेकदा रुग्णाला व्हेंटीलेटर मिळेपर्यंत वेळ जातो, अशा स्थितीत हा प्रयोग यशस्वी ठरत आहे. रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल स्थिर ठेवतानाच ऑक्सिजनचा वापरही मर्यादीत होतो असा या प्रणालीचा हा दुहेरी फायदा असल्याची माहिती आज बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर हेही या प्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा: इंदापूरात दोन शिकाऱ्यांना वनविभाकडून अटक

डॉ. काळे म्हणाले, ''ही प्रणाली व्हेंटीलेटरला पर्याय नाही मात्र व्हेंटीलेटर मिळेपर्यंत रुग्णाची ऑक्सिजनची पातळी स्थिर ठेवण्यासाठी व्हेन सर्किटचा उपयोग होतो आहे असे डॉ. राहुल जाधव व डॉ. सुजित अडसूळ यांनी केलेल्या प्रयोगावरुन सिध्द झाले आहे. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील रुग्णावरही हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. रुग्णाला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवितानाही व्हेन सर्किट प्रणाली उपयुक्त ठरू शकेल. यात रुग्णाला शुध्द ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्या मुळे पातळी स्थिर राहण्यासही त्याची मदत होते. ''

किरण गुजर म्हणाले की हा प्रयोग बारामतीपुरताच मर्यादीत न राहता इतरही ठिकाणी झाला तर त्याचा लाभ रुग्णांना होऊ शकेल, असे वाटते. डॉ. राहुल जाधव यांच्या या प्रयोगाची माहिती मिळाल्यानंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात हा प्रयोग यशस्वी ठरल्याने त्याची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला

काय आहे ही व्हेन सर्किट प्रणाली....

भूल देण्यासाठी वायू रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी व्हेन सर्किट वापरले जाते. कोविड रुग्णाच्या नाकामध्ये नेझल कॅनुलाने ऑक्सिजन दिला तर जास्त प्रमाणात ऑक्सिजन द्यावा लागतो, ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हावा व बचत व्हावी या संकल्पनेतून मास्क विथ रिगरवायर बॅग याचा वापर होऊ लागला आहे. यामुळे ऑक्सिजन सॅच्युरेशन नियंत्रित राहू शकते. या संकल्पनेतून व्हेन सर्किटचा वापर कोविडच्या रुग्णाला करता येईल हे जाणवल्यानंतर ही संकल्पना वापरुन पाहिली, त्याचा उपयोग झाला. व्हेन सर्किटमध्ये रिगरवायर बॅग व लाँग कंडक्टिंग ट्यूब असते ज्या मुळे रुग्णाच्या ब्रेथ एफर्टसवर रिगरवायर बॅगमधील ऑक्सिजन जास्त प्रेशरने कंडक्टिंग ट्यूबला कनेक्ट केलेल्या मास्कद्वारे पुरविला जाऊ शकतो.

– डॉ. राहुल जाधव.