MP Supriya Sule : विरोधकांनी काही बोलायचे नाही, बोलले तर तुरुंगात जायचे किंवा भाजपमध्ये प्रवेश करायचा

जो विरोधात बोलतो त्यावर कोणती तरी कारवाई केली जाते. जगातली लोकशाही धोक्यात आली आहे.
mp supriya sule
mp supriya sule sakal

बारामती - कॉंग्रेसची खाती गोठविणे, एजन्सींचा विरोधकांविरुध्द होणारा वापर, एजन्सीचे अधिकारी दबावाखाली, विरोधकांनी काही बोलायचे नाही बोलले तर एकतर तुरुंगात जायचे किंवा भाजपमध्ये प्रवेश करायचा इतकाच विषय या देशात राहिलेला आहे, ही अघोषित आणीबाणीच नाही का, असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळेंनी केला. बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

ईडी व सीबीआय यांनी केलेल्या कारवायांपैकी 95 टक्के फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवरच झाल्या आहेत, असा एक सरकारी डेटा कालच आला आहे. अरविंद केजरीवालांची अटक दुर्देवी असून लोकशाहीचा दररोज या देशात खून होतो आहे, स्वातंत्र्य राहिलेच नाही, भाजपकडून अघोषित आणीबाणी आहे.

जो विरोधात बोलतो त्यावर कोणती तरी कारवाई केली जाते. जगातली लोकशाही धोक्यात आली आहे. ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना भाजप प्रवेश देते आहे. रोहित व युगेंद्र पवार गेले काही दिवस प्रचार करत आहेत.

ज्या पध्दतीने युगेंद्र प्रथमच माझा प्रचार करत आहे, वारंवार तो बाहेर गेल्यावर शांततेच्या मार्गाने प्रचार करतोय, दर वेळेस त्यालाच कसा घेराव घातला जातो, मला माध्यमातून समजले, त्याला जाब का विचारता, मला जाब विचारा, मला घेराव घाला, मी उत्तर द्यायला सक्षम आहे, आमच्या घरातील मुलांवर ज्या पध्दतीने घेराव घातला जातो हे दुर्देवी आहे, गुंडागर्दी महाराष्ट्रात चालणार नाही.

पोलिसांकडून आपणहून आम्हाला जेव्हा इनपुट आले तेव्हा मला काळजी वाटली, त्या नंतर मी पोलिसांना पत्र दिले, असाही खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला.

बारामतीत शांततेचा मार्गाने सगळे प्रचार करतात, नियम तोडणार नाही, आमची ती संस्कृती नाही, ज्या पध्दतीने त्या मुलांना टारगेट केले जाते, ते धक्कादायक आहे. बारामतीचे नाव यात खराब होत आहे. मला दिल्लीहून खूप फोन आले असेही त्या म्हणाल्या.

देशात कार्यकर्त्यांना होणारी अटक ही अघोषित आणीबाणी आहे, माझही निलंबन कांद्याच्या प्रश्नावर आवाज उठविला म्हणून झाले होते, पण मी लढत राहणार. विजय शिवतारे निवडणूक लढविणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे, निवडणूक लढविण्याचाही अधिकार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com