Corona Virus : बारामतीकरांना भाजी व फळेही घरपोच मिळणार !

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

नवनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने ही सुविधा बारामतीकरांना दिली जाणार आहे. यात कांदे 3 किलो, वांगी 1 किलो, भोपळा किंवा दोडका 1 किलो, टोमॅटो 1 किलो, शेवगा अर्धाकिलो, गवार अर्धा किलो, भेंडी अर्धा किलो, मिरची पावकिलो, कोथिंबीर दोन जुड्या असे किट तीनशे रुपयात घरपोच दिले जाणार आहे.

बारामती : कोरोनामुळे बारामतीत भीलवाडा पॅटर्न राबविण्यात येत असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये या साठी भाजी व फळे घरपोच देण्याची योजना आखली असल्याची माहिती नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नवनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने ही सुविधा बारामतीकरांना दिली जाणार आहे. यात कांदे 3 किलो, वांगी 1 किलो, भोपळा किंवा दोडका 1 किलो, टोमॅटो 1 किलो, शेवगा अर्धाकिलो, गवार अर्धा किलो, भेंडी अर्धा किलो, मिरची पावकिलो, कोथिंबीर दोन जुड्या असे किट तीनशे रुपयात घरपोच दिले जाणार आहे. या शिवाय अतिरिक्त पैसे देऊन कलिंगड, खरबूज, चिकू, द्राक्षे हीही ग्राहक खरेदी करु शकणार आहेत. दररोज सकाळी 9 ते 11 या वेळेत भाजीची किट घरपोच दिली जाणार आहेत. 

...म्हणून येताहेत शिवभोजन मिळविण्यात अडचणी
या संदर्भात ज्यांना मागणी नोंदवायची असेल राजेश चांदणे -9890090927, 
अक्षय माने -90497 69977 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक अभिजीत चव्हाण, मिलिंद दरेकर, सागर गायकवाड हे या उपक्रमाचे नियोजन करीत आहेत.

Lockdown : भाडे नाही तर, घर सोडा: मालकांच्या तंबीला विद्यार्थी वैतागले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati people will get vegetables and fruits at home